ज्ञानप्रबोधिनीत बुधवारपासून संगीत संमेलन

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पिंपरी - विद्यार्थ्यांमध्ये संगीतविषयक अभिरुची वाढावी, या उद्देशाने निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात बुधवार (ता. २१) आणि गुरुवारी (ता. २२) संगीत संमेलन आयोजित केले आहे. त्यानिमित्त सूर, ताल आणि वाद्याचा अनोखा संगम विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. 

पिंपरी - विद्यार्थ्यांमध्ये संगीतविषयक अभिरुची वाढावी, या उद्देशाने निगडी-प्राधिकरणातील ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालयात बुधवार (ता. २१) आणि गुरुवारी (ता. २२) संगीत संमेलन आयोजित केले आहे. त्यानिमित्त सूर, ताल आणि वाद्याचा अनोखा संगम विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. 

संमेलनातील सर्व कार्यक्रम मनोहर वाढोकर सभागृहात होणार आहेत. त्याला ‘पं. भीमसेन जोशीनगरी’ असे नाव दिले जाईल. शाळेचे आठवी, नववीचे ४०० विद्यार्थी आणि १२५ अध्यापक कार्यक्रमात सहभागी घेतील. ज्ञानप्रबोधिनी निगडी केंद्र यंदाचे वर्ष ‘संगीत वर्ष’ म्हणून साजरे करीत आहे. विद्यार्थ्यांसह अध्यापकांना देखील संगीताचे धडे मिळावे तसेच, संगीत परंपरा जोपासून वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने संगीत संमेलन घेण्यात आले आहे. संगीत दिंडी, मार्गदर्शन, परिसंवाद, कार्यशाळा अशी विविध सत्रे त्यामध्ये होतील. संमेलनाचे उद्‌घाटन बुधवारी सकाळी ९:३० वाजता होईल. त्या प्रसंगी ‘संगीतातील आनंद : एका कलाकाराचा प्रवास’ विषयावर संमेलनाध्यक्ष रामदास पळसुले मार्गदर्शन करतील, अशी माहिती केंद्र उपप्रमुख मनोज देवळेकर यांनी दिली.

कार्यक्रमांची रूपरेषा
बुधवार, ता. २१

सकाळी ८ : संगीत दिंडी. ११.३० : शास्त्रीय गायन, तबला आणि संवादिनी वादन यांची ओळख : सहभाग : पौर्णिमा धुमाळ, प्रमोद मराठे (संवादिनी), रामदास पळसुले (तबला), डॉ. नंदकिशोर कपोते (नृत्य) : सूत्रसंचालन : कीर्तनकार चारुदत्त आफळे. दुपारी २:३० : शास्त्रीय गायन, नाट्यसंगीत, कीर्तन, संवादिनी, तबला, नृत्य, चाली लावणे, पोवाडा, भजन, प्रबोधन गीते, तालवाद्य, सतार आदींविषयी कार्यशाळा. दुपारी ४:३० : समीर दुबळे यांचे ‘संगीताचा आस्वाद कसा घ्यावा?’ विषयावर व्याख्यान.

गुरुवार, ता. २२
सकाळी ९:३० : डॉ. विकास कशाळकर यांचे ‘भारतीय संगीताचा इतिहास व वाटचाल’ विषयावर व्याख्यान, तसेच विविध वाद्यांच्या ओळखीचा कार्यक्रम. दुपारी ३ : सलील कुलकर्णी यांचे ‘दैनंदिन जीवनातील संगीत’ विषयावर व्याख्यान. दुपारी ४:३० : संगीत संमेलनाचा समारोप, परिसरातील विविध संगीत संस्थांचा सन्मान, रामदास पळसुले यांचे एकल तबलावादन.

Web Title: marathi news pimpri sangeet sammelan