महापालिकेच्या तिजोरीत निम्माच मिळकतकर जमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 मार्च 2018

पुणे - महापालिकेला मिळकतकरातून यंदाही अपेक्षित उत्पन्न मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, या कराच्या उद्दिष्टापैकी निम्मेच उत्पन्न मिळाले आहे. मार्चअखेरपर्यंत आणखी दीडशे कोटी रुपये जमा होण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे, महापालिकेत आलेल्या नव्या गावांमधून मिळकतकराचे सुमारे दहा कोटी रुपये मिळाले आहेत. 

शहर आणि उपनगरांमध्ये निवासी आणि व्यावसायिक मिळकतींची संख्या आठ लाख इतकी आहे. त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळते. अर्थसंकल्पात २०१७-१८ मिळकतकर विभागाला १ हजार ८१६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल, असे गृहीत धरण्यात आले होते. प्रत्यक्षात मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ९९४ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. मिळकतकराची थकबाकी वसूल होऊन उत्पन्नात वाढ होण्याची शक्‍यता होती. मात्र, तसे होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत एक हजार २०० कोटी रुपये मिळाले होते; परंतु थकबाकी वसूल व्हावी, यासाठी जाहीर केलेल्या अभय योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याने त्यात भर पडल्याचे सांगण्यात येत आहे. मिळकतकर विभागाचे प्रमुख विलास कानडे म्हणाले, ‘‘थकबाकी वसुलीची मोहीम सुरू असल्याने उत्पन्नाचा आकडा वाढेल. मिळकतकरधारकांना नव्या वर्षाची बिले पोस्टाने देण्यात येत आहेत.’’

Web Title: marathi news PMC income tax