देशातील 23 शहरांमध्ये पुणे अव्वल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पुणे - महापालिकेची आर्थिक परिस्थिती, कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया, राजकीय स्थैर्य, लोकसहभाग आणि शाश्‍वत विकासासाठी वाटचाल आदी मुद्द्यांच्या आधारे पुणे शहराने २० राज्यांतील २३ शहरांत देशात पहिले स्थान पटकावले आहे. बंगळूरच्या जनग्रह संस्थेने एका सर्वेक्षणात देशातील शहराच्या विक्रास प्रक्रियेचे मूल्यांकन केले, त्यात हे स्पष्ट झाले आहे.  

पुणे - महापालिकेची आर्थिक परिस्थिती, कर्मचारी नियुक्ती प्रक्रिया, राजकीय स्थैर्य, लोकसहभाग आणि शाश्‍वत विकासासाठी वाटचाल आदी मुद्द्यांच्या आधारे पुणे शहराने २० राज्यांतील २३ शहरांत देशात पहिले स्थान पटकावले आहे. बंगळूरच्या जनग्रह संस्थेने एका सर्वेक्षणात देशातील शहराच्या विक्रास प्रक्रियेचे मूल्यांकन केले, त्यात हे स्पष्ट झाले आहे.  

पाच शहरांत पुणे शहराने ५.१ गुण मिळविले असून पाठोपाठ कोलकता, तिरुअनंतपुरम, भुवनेश्‍वर, सुरत या शहरांचा समावेश आहे. सर्वेक्षणात ८९ प्रश्‍नांच्या आधारे गुण देण्यात आले आहेत. जागतिक सर्वेक्षणात लंडन आणि न्यूयॉर्कला प्रत्येकी ८.८, तर जोहान्सबर्गला ७.६ गुण मिळाले आहेत. रस्ते, वाहतूक, कचरा व्यवस्थापन, गृहनिर्माण, सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण या पारंपरिक मुद्द्यांचा सर्वेक्षणात आधार घेण्यात आलेला नाही. तर, महापालिकेचे पतमानांकन, कर्मचारीवर्ग, राजकीय स्थैर्य, पारदर्शकता आणि लोकसहभाग, तसेच शाश्‍वत विकासासाठीच्या योजनांचा विचार करण्यात आला आहे, असे ‘जनग्रह’चे उपप्रमुख (ॲडव्होकसी आणि रिफॉर्म्स) अनिल नायर यांनी सांगितले.  

चारपेक्षा कमी गुण मिळविणारी देशातील दहा शहरे आहेत. नागरिकांचे राहणीमान उंचावण्यात त्या शहरांत अपयश आलेले आहे. त्यामुळे पूरसदृश परिस्थिती, कचरा समस्या, आगीच्या घटना, इमारती पडणे, प्रदूषण, डेंगीसारखे आजार आदी समस्या तेथे उद्‌भवत आहेत, असेही ‘जनग्रह’ने म्हटले आहे. 

पहिल्यांदाच पुण्याला मान
जनग्रहच्या सर्वेक्षणात पुणे शहराने प्रथम क्रमांक पहिल्यांदाच पटकावला आहे. गेल्या वर्षीच्या सर्वेक्षणात तिरुअनंतपुरम शहर प्रथम क्रमांकावर होते, तर २०१६ मध्ये १२ व्या क्रमांकावर असलेल्या सुरतने यंदा पाचव्या स्थानावर मजल मारली आहे. या महापालिकांनी केलेले पतमानांकन, उत्पन्नवाढीसाठीचे प्रयत्न, तसेच केंद्र सरकारच्या योजनांच्या माध्यमातून प्रकल्पांना केलेली सुरवात आदी घटक त्यास कारणीभूत आहेत, असे सर्वेक्षणाचे सहयोगी व्यवस्थापक विवेक नायर यांनी म्हटले आहे. बंगळूर, चंदीगड, डेहराडून, पाटना आणि चेन्नई यांचे ३ ते ३.३ दरम्यान गुण आहेत. चारपेक्षा कमी गुण असलेल्या दहा शहरांत त्यांचा समावेश आहे. 

Web Title: marathi news PMC World Survey pune news