गरज आहे 'आवाजाची'

प्राजक्ता ढेकळे
सोमवार, 9 ऑक्टोबर 2017

नवरात्र संपताच वेध लागतात दिवाळीचे. दिवाळी सणाच्या निमित्ताने राबवलेल्या  जाणाऱ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाविषयी...

समोरच्या व्हरांड्यात अंथरलेल्या दोन बसकरावर एकमेकांमच्या समोर बसत ते आपलं रंग, ब्रश, पणत्या, कागद यासारख्या विविध वस्तू व्यवस्थित ठेवत होती. या वस्तू ठेवताना ती पडून नये, सांडू नये, कुणाचा धक्का त्याला लागू नये, पायाखाली तुडवली जाऊ नये याची पुरेपुर काळजी त्याच्या कडून घेतली जात होती. वरिष्ठांनाकडून  खाणा खुणाच्या माध्यमातून दिल्या जाणार्‍या सूचना ते अचूक पालन करत त्यांनी आपल्या कामाला सुरवात केली. कुणी पणत्यांना रंग देत होते तर कुणी , कुणी पणत्यांवर कुंदन, खडे, कागदी फुलांची नक्षी चिकटवत होते, कुणी तयार झालेल्या पणत्याचे व्यवस्थित पॅकिंग करत होते.
 
ही सगळी कामे एकत्रित सुरू असताना, एकमेकांच्या कामाचे  कौतुकही चेहर्‍यावरील हावभाव आणि बोलक्या डोळ्यांनी, ओठांने स्मिथ हास्यकरीत तर कधी डोळे विस्फारून आवाक होत केलेल्या कामाचे कौतुक करत, आपल्या कामात मग्न होती. हे सगळ चित्र कोणत्या कुंभार वाड्यात,  कार्यशाळेत,  सर्वसाधारण शाळेत नव्हे, तर  आपटे प्रशालेच्या प्रांगणातील शारीरिक दृष्टया विशेषत्व प्राप्त झालेल्या मूक-बधिर विकास संशोधन केंद्रात पाहायला मिळत होते.

आपटे प्रशालेतील मूक - बधिर विकास संशोधन केंद्राकडून राबविल्या जाणाऱ्या अनेक नावीन्यपूर्ण उपक्रमातील पणत्या,  आकाशकंदील,  भेटकार्ड यांच्या निर्मिती आणि विक्रीचा व्यवसाय हा एक उपक्रम होय.

या उपक्रमाच्या माध्यामातून दिवाळीसाठी विविध प्रकारच्या आकर्षक रंगीबेरंगी पणत्या,  आकाश कंदील बनवण्याचे काम ही मुले करत असताना . त्यासाठी बाजारातून कच्च्या पणत्यांच्या नगाच्या खरेदीपासून,  रंग,  कागद,  ब्रश यासारख्या अनेक गोष्टीची  खरेदी ते आपल्या शिक्षकांच्या मदतीने करतात. हे काम करत असताना बाजारातील नवनवीन ट्रेंड्स,  नक्षीकाम,  ग्राहकांची पसंतीला प्राधान्य दिले जाते. शारीरिक दृष्ट्या जरी विशेषत्व असले तरी सर्वसामान्य पेक्षा कुठेही कमी नाहीत यांचा प्रत्यय या मुलांच्या कामातून पहायला मिळतो. 

उपक्रमाचे वैशिष्ट्य
या उपक्रमाच्या माध्यमातून केलेल्या स्वकमाई मधूनही मुले स्वत:साठी, घरच्यांसाठी दिवाळीसाठी कपडे, मिठाई यासारख्या वस्तूंची खरेदी करतात. याप्रकारच्या  व्यावसायिक प्रशिक्षणमुळे  कमी भांडवलामध्ये  लघुउद्योग उभारणीचे प्रशिक्षण दिले जाते.

गरज मदतीच्या हाताची...
दिवाळीला सुरवात होण्याआधी हे सर्व साहित्य तयार करून हे विद्यार्थी विक्रीसाठी सज्ज असतात. मात्र या विद्यार्थ्यांची मुख्य समस्या म्हणजे तयार केलेला वस्तूंची विक्री बाजार पेठेत विक्री करू शकत नाहीत.  त्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्यासाठी बोलणाऱ्या स्वयंसेवकांची मदत हवी आहे.  असे स्वयंसेवक जे बाजारात त्यांच्या वस्तूंची विक्री करण्यास मदत करतील. . यावर्षी मुलांनी  दिवाळीसाठी तयार केलेल्या वस्तूची विक्री करण्यासाठी समाजातील लोकांनी  स्वयंसेवक म्हणून पुढे यावे असे आवाहन या विकास केंद्राकडून करण्यात आले आहे. याबरोबरच मुलांनी तयार केलेल्या वस्तूंची थेट खरेदी करूनही मदत करू शकता.

संपर्क : 
आश्‍विनी जोशी- 9423574750
महेंद्र अरवीकर- 9822762341
सविता खरात - 25538161
 
शाळेविषयी थोडेसे...
आपटे प्रशालेच्या  प्रांगणामध्ये हे मूक- बधीर विकास संशोधन केद्र चालवले जाते. या संशोधन केंद्रात प्रशिक्षण घेणार्या  एकूण चाळीस मुलांमध्ये पंचवीस मुले तर पंधरा मुलींचा समावेश आहे.  या चाळीस मुलांनामदत करण्यासाठी पाच शिक्षक याठिकाणी कार्यरत आहेत.  या विकास केंद्रात टायपिंग, पुस्तकांची मांडणी, लेआऊट, मिक्सर दुरूस्ती, ब्युटीपार्लर, इलेक्ट्रीकल वस्तूंच्या दुरूस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. याशिवाय मेंहदी डिझाईन्स, रांगोळी काढण्याचे प्रशिक्षणही दिले जाते.       
Web Title: marathi news prajakta dhekale writes about special children's initiative