फुले दांम्पत्याला भारतरत्न द्यावा - खा. सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
सोमवार, 5 मार्च 2018

बारामती - महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी आज लोकसभेत केली. नियम 377 अंतर्गत त्यांनी हा विषय मांडला. दलित, शोषित, स्त्री, शेतकरी या सर्वांच्या भल्यासाठी हे दांपत्य शेवटपर्यंत झुंजले. आजच्या एकसंध समाजासाठी त्यांनी केलेल्या कार्यास वंदन करण्यासाठी, त्यांना भारतरत्न जाहीर व्हावा, यासाठी आपण सर्व पक्षभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा पाया रचला. मुलींसाठी पहिली शाळा 1848 साली पुण्यात त्यांनी सुरू केली. पिढीजात चालत आलेल्या अनिष्ट धार्मिक रूढी व परंपरा बंद झाल्याशिवाय समाजामध्ये परिवर्तन होणार नाही हे त्यांनी ओळखले होते. सामाजिक सुधारणांसाठी व्यापक योगदान देऊन, आपल्या मानवतावादी भूमिकेतून वंचित आणि उपेक्षित घटकांना मुख्य समाजप्रवाहात आणण्याचे महत्त्वपूर्ण कार्य महात्मा फुले यांनी केले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार दिल्यास तो या पुरस्काराचाच गौरव ठरेल अशी भावना सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: marathi news pune baramati bharatratna mahatma phule supriya sule