'इर्जीक'चा उपक्रम राबवून सात एकर ज्वारीची काढणी 

विजय मोरे 
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

उंडवडी - श्रमाच्या पुजाऱ्यांचे हात शेतात राबण्यासाठी एकत्र आल्यानंतर कामे कशी चुटकी सरशी मार्गी लागतात. याचा प्रत्यय बारामती तालुक्यातील कारखेलकरांना नुकताच आला. निमित्त होते, कारखेल येथील शेतकरी चांगदेव जगताप यांच्या शेतातील ज्वारी काढणीसाठी केलेल्या 'इर्जीक' या उपक्रमाचे... ! 

कारखेल (ता. बारामती) येथील शेतकरी चांगदेव जगताप यांनी रब्बी हंगामातील ज्वारीच्या काढणीसाठी 'इर्जीक'चा उपक्रम यशस्वीपणे राबविला. या उपक्रमात सोळा ते सत्तरा तरुणांनी तब्बल सात एकर क्षेत्रातील ज्वारीची काढणी काही तासातच केली. 'इर्जीक' या उपक्रमामुळे जगताप यांचा वेळ आणि पैशाची बचत झाली. 

बारामती तालुक्याच्या जिरायती भागातील कारखेलच्या परिसरात सद्या रब्बी हंगामातील ज्वारीची पिके अंतिम टप्यात आली आहेत. त्यामुळे बहुतांशी शेतकऱ्यांनी ज्वारीची काढणी व कणसे खुडणीची कामे सुरु केली आहेत. काही शेतकऱ्यांनी मजूरांना एकरी पाच ते सहा हजार रुपये याप्रमाणे ज्वारी काढणी व बांधणीचा ठेका दिला आहे. परिसरात बहुतांश शेतकऱ्यांची सुगी एकाच वेळी आल्याने मजूरांची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे कारखेल येथील शेतकरी चांगदेव माणिकराव जगताप यांनी आपल्या ज्वारीची काढणी वेळेत व्हावी, व सद्या जाणवत असलेल्या मजूर टंचाईवर उपाय योजना म्हणून 'इर्जीक'चा उपक्रम यशस्वीपणे राबवून सात एकर ज्वारीची काढणी करुन घेतली व सर्वांना इर्जीक या उपक्रमाअंतर्गत सायंकाळी आवडीचे जेवण दिले.      

जगताप यांनी रविवारची सुट्टीचा दिवस गाठून परिसरातील तरुणांना एकत्र आणले होते. रविवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सोळा ते सत्तरा तरुण ज्वारीच्या शेतावर एकत्र आले होते. 'भल्लरी ...दादा...भल्लरी...' चे गायन करत ज्वारीच्या काढणीला सुरवात झाली. यामध्ये घरातील मुले, महाविद्यालयीन विद्यार्थी, व शेजारील शेतकऱ्यांचा समावेश होता. उन्हां तान्हाची तमा न बाळगता एकीच्या बळावर सहा ते सात तासात ज्वारीची काढणी करण्यात आली. कामात कंटाळा येवू नये व सर्वांचा उत्साह वाढवा. यासाठी अनुभवी शेतकरी भल्लरी गायन करत होते. दिवसभराच्या ज्वारीच्या काढणीनंतर सायंकाळी सर्वांनी मांसाहारी व शाकाहारी जेवणावर मनसोक्त ताव मारालां. जगताप यांचा 'इर्जीक' च्या उपक्रमाला जेवणासाठी चार ते पाच हजार रुपये खर्च झाला. मात्र ज्वारीच्या काढणीसाठी मजुरीवर होणारा सुमारे तीस ते पस्तीस हजार रुपयांची बचत झाली. आणि काम वेळेत पूर्ण झाले.  

याबाबत 'सकाळ' शी बोलताना शरद चांगदेव जगताप म्हणाले, 'आम्ही गेल्या वर्षीही ज्वारी काढणीसाठी 'इर्जीक' चा उपक्रम राबविला होता. अशा उपक्रमामुळे सर्वांचा एकोपा राहण्यास मदत होते. तसेच वेळ आणि पैशाची बचत होवून शेतातील कामे अगदी वेळेत पूर्ण होण्यास मदत होते. त्यामुळे आम्ही यंदाही 'इर्जीक' चा उपक्रम मोठ्या उत्साहाने राबविला.' 

Web Title: marathi news pune baramati Irgik sorghum