डोळ्यात मिरचीची पूड टाकून लूटले

मिलिंद संगई
रविवार, 4 मार्च 2018

डोळ्यात मिरचीची पूड टाकून दोन मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा दोन लाख दहा हजारांचा ऐवज चोरुन नेण्यात आला होता. 22 फेब्रुवारी रोजी लोणी देवकर नजिक ही लूट करण्यात आली होती.

बारामती - चिंचेच्या व्यापाऱ्याला लुटणाऱ्या दोघांना गुन्हे शोध पथकाने जेरबंद केले आहे. नरुला दस्तुरसाहब पठाण (वय 40, चिंचव्यापारी, चित्तूर, आंध्रप्रदेश) यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील दोन मोबाईल हँडसेट व रोख रक्कम असा दोन लाख दहा हजारांचा ऐवज चोरुन नेण्यात आला होता. 22 फेब्रुवारी रोजी लोणी देवकर नजिक ही लूट करण्यात आली होती. या संदर्भात पठाण यांनी इंदापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. 

गुन्हे शोध पथकाचे सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, पोलिस कर्मचारी शिवाजी निकम, संजय जगदाळे, संदीप मोकाशी, संदीप कारंडे, सदाशिव बंडकर यांनी या प्रकरणातील संशयित प्रवीण कानिफनाथ पवार व कल्पना कानिफनाथ पवार यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. 

चिंचा खरेदी करण्याच्या बहाण्याने नरुला पठाण यांना प्रवीण पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी फोन करुन लोणी देवकर येथे बोलाविले होते. मात्र चिंचा खरेदीचा बहाणा करुन पठाण यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील मोबाईल व रोकड पळवून नेण्यात आली. याबाबत सखोल तपास करुन गुन्हे शोध पथकाने प्रवीण पवार व कल्पना पवार यांना ताब्यात घेत इंदापूर पोलिसांकडे सुपूर्द केले. 

 

Web Title: marathi news pune baramati thief mobile money police arrested