भाजप घराणेशाही की भौगोलिक समतोल साधणार? 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 मार्च 2018

पुणे - महापालिका स्थायी समितीच्या तब्बल पावणेसहा हजार कोटी रुपयांच्या तिजोरीच्या किल्ल्या आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षातील इच्छुकांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. समितीचा अध्यक्ष निवडताना घराणेशाही की भौगोलिक समतोल साधला जाणार का ? याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. अध्यक्षपदासाठी एक राज्यमंत्री आणि एका आमदाराचे बंधू शर्यतीत असून, या दोघांपैकी एकाच्या नावाचा विचार झाल्यास भाजपवर घराणेशाहीचा शिक्कामोर्तब होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ज्या भागाला पद मिळाले नाही, तेथील सदस्याला संधी मिळणार का, या बाबत पक्षात उत्सुकता निर्माण झाली आहे. 

दरम्यान, स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी शनिवारी (ता. 3) उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असून, येत्या बुधवारी (ता. 7) अध्यक्षाची निवड होईल. या पदासाठी भाजपकडे पाच ते सहाजण इच्छुक आहेत. मात्र अध्यक्ष निवडीचे चित्र शनिवारी दुपारी स्पष्ट होईल. 

स्थायी समितीचा कार्यकाळ एक मार्चला संपुष्टात आला असून, त्यामुळे नव्या अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी जुन्या-नव्या सदस्यांनी "फिल्डिंग' लावली आहे. विशेष म्हणजे, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांचे बंधू आणि ज्येष्ठ नगरसेवक सुनील कांबळे यांच्यासह आमदार जगदीश मुळीक यांचे बंधू योगेश, आमदार योगेश टिळेकर यांच्या मातुःश्री रंजना टिळेकर यांची नावे चर्चेत आहेत. त्याचबरोबर मंजुषा नागपुरे, निलिमा खाडे याही नावांचा विचार होऊ शकतो, असा अंदाज आहे. मात्र कांबळे आणि मुळीक हे या पदासाठी दावा करीत असले, तरी त्यांना संधी मिळाल्यास घराणेशाहीचा मुद्दा उपस्थित होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, स्थायीच्या नव्या सदस्यांनी घराणेशाहीला प्राधान्य दिल्याने पक्षातील जुन्या कार्यकर्त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. एवढेच नाही, निवडणुकीच्या तोंडावर अन्य पक्षांतून आलेल्या मंडळींना स्थायी समितीत सदस्य म्हणून स्थान दिल्याने नाराजीचा सूर होता. 

या पार्श्‍वभूमीवर स्थायीचा अध्यक्ष निवडताना नेतृत्व नेमकी काय भूमिका घेणार, याबाबची उत्सुकता पक्ष वर्तुळात आहे. 

अनपेक्षित नावांचाही विचार 
स्थायी समितीचे अध्यक्ष ठरविताना पक्षाच्या पातळीवर आगामी निवडणुकांचे गणित गृहीत धरले जात असले, तरी घराणेशाही, जातीय, राजकीय आणि भौगोलिक समीकरणे महत्त्वाची मानली जात आहेत. त्यामुळे ज्या भागातील सदस्याला आतापर्यंत पद मिळाले नाही, त्या नावांचा विचार होऊ शकतो, असेही पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे ही निवड पक्ष नेतृत्वासाठी नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्हे आहेत. याआधी स्थायीचे अध्यक्षपद कोथरूडला देण्यात आले. महापौरपद कसब्यात, तर सभागृहनेतेपद पर्वती मतदारसंघात आहे. त्यामुळे अन्य मतदारसंघांतील चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. त्यात शिवाजीनगर आणि वडगावशेरी मतदारसंघांतील नावांची चर्चा असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Web Title: marathi news pune BJP PMC