शिष्यवृत्तीसाठी यंदापासून कार्बनलेस उत्तरपत्रिका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

पुणे - इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी येत्या रविवारी (ता. 18) होणारी शिष्यवृत्ती परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा बैठक क्रमांक हाच उत्तरपत्रिकेचा बारकोड असणार आहे. तसेच, उत्तरपत्रिकेची डिजिटल कॉपी दिली जाणार नाही, तर या वर्षीपासून कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येईल. उत्तरपत्रिकेची कॅंडिडेट कॉपी परीक्षार्थींना दिली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रेय जगताप यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. 

राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता आठवी) राज्यातील सर्व जिल्ह्यात एकाच वेळी होत आहे. गेल्या वर्षी राज्यातील जवळपास साडेनऊ लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. या वर्षी राज्यातील सुमारे आठ लाख 58 हजार 465 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. पुणे जिल्ह्यात पाचवी आणि आठवीचे एकूण तब्बल 81 हजार 423 परीक्षार्थी आहेत. त्यातील इयत्ता पाचवीसाठी 51 हजार 217, तर आठवीसाठी 30 हजार 206 विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. जिल्ह्यातील पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी अनुक्रमे 303 आणि 175 केंद्र आहेत, अशी माहिती परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी या वेळी दिली. 

अंशतः अंध, अंध किंवा लिखाण करणाऱ्या हातास मोठी जखम वा अपघात झालेला असल्यास, विद्यार्थ्याने वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यास त्याची वेगळ्या वर्ग खोलीत बैठक व्यवस्था करावी. त्या विद्यार्थ्यास त्याच्या संमतीने खालच्या इयत्तेतील विद्यार्थी लेखनिक म्हणून उपलब्ध करून द्यावा. तसेच संबंधित विद्यार्थ्यास एका पेपरसाठी जादाची तीस मिनिटे उपलब्ध करून देण्यात येतील, असेही जगताप यांनी नमूद केले.

Web Title: marathi news pune Carbonalas answer papers from this year for scholarships