गावठी कट्टा बाळगणाऱ्यास अटक

संदीप घिसे
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

पिंपरी - गावठी कट्टा बाळगणाऱ्या एकास वाकड पोलिसांनी अटक केली. ही घटना काळेवाडी येथे घडली. रणजितकुमार जवाहरलाल यादव (वय २२, रा. पवनानगर काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कमरेला पिस्तूल लावून एक व्यक्ती काळेवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिस हवालदार बिभिषण कन्हेरकर यांना मिळाली. त्यानुसार सापळा लावून त्यास ताब्यात घेतले. झडती घेतली असता त्याच्याकडे गावठी कट्टा मिळाला. आरोपी यादव हा मूळचा उत्तर प्रदेशातील असून सध्या पिंपरी चिंचवड शहरात बांधकामाचा ठेका घेतो. अधिक तपास वाकड पोलिस करीत आहेत.

Web Title: marathi news pune crime illegal weapon arrested