मसापच्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जानेवारी 2018

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या दिवाळीअंक स्पर्धेचा (2017) निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत उत्कृष्ट दिवाळी अंकासाठीचे. अ. स. गोखले स्मृतिप्रीत्यर्थ 'रत्नाकर पारितोषिक' 'मौज' या दिवाळी अंकाला, चंद्रकांत शेवाळे पुरस्कृत 'विविध ज्ञानविस्तारकर्ते रावसाहेब मोरमकर पारितोषिक 'ललित' या दिवाळी अंकाला, 'मासिक मनोरंजनकार का. र. मित्र पारितोषिक' 'समदा' या दिवाळी अंकाला, 'शं. वा. किर्लोस्कर पारितोषिक' 'साहित्य शिवार' या दिवाळी अंकाला, त्याच बरोबर डेलिहंट पुरस्कृत उत्कृष्ट ऑनलाईन दिवाळी अंकाचे पारितोषिक 'अक्षरनामा' या दिवाळी अंकाला देण्यात येणार आहे. 

'जानकीबाई केळकर' स्मृतिप्रीत्यर्थ 'उत्कृष्ट बालवाङ्मयदिवाळी अंकाचे पारितोषिक' 'मनशक्ती' या दिवाळी अंकाला आणि दिवाळी अंकातील उत्कृष्ट कथेसाठीचे 'दि. अ. सोनटक्के पारितोषिक' 'अक्षर' या दिवाळी अंकातील विजय खाडिलकर यांच्या 'आवर्त' या कथेला, तर उत्कृष्ट ललित लेखासाठीचे 'अनंत काणेकर पारितोषिक' 'शब्दशिवार' या दिवाळी अंकातील डॉ. रणधीर शिंदे यांच्या 'येडापीसा वारा चिकटलेला जन्मभर तुझ्या देहाला' या लेखाला जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी यावर्षी महाराष्ट्रातून १८८ दिवाळी अंक आले होते. त्यातून वरील दिवाळी अंकाची पारितोषिकांसाठी निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून डॉ. अविनाश सांगोलेकर, विनया देसाई, प्रभा सोनवणे यांनी आणि ऑनलाईन दिवाळी अंकासाठी प्रतिक पुरी यांनी काम पाहिले.    

या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार 1 फेब्रुवारी 2018 सायंकाळी 6.30 वा. साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे आणि पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते होणार आहे.

Web Title: Marathi news pune declare best diwali magazines by MSP