अन् पाच बिबट्यांना मिळाले स्वतःचे प्रशस्त घर..

दत्ता म्हसकर
शनिवार, 3 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : माणिकडोह ता.जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रातील बिबट्यांना आज शनिवारी (ता.3) स्वत:चे प्रशस्त घर मिळाले. जागतिक वन्यप्राणी दिनाचे औचित्य साधून विविध वर्तमान पत्रे व वृत्त वहिनीच्या प्रतिनिधींच्या साक्षीने जुन्नर वनविभागाने या उपक्रमाचे आयोजन केले होते.

मानव बिबट संघर्षात जेरबंद करण्यात आलेले 35 बिबटे या निवारा केंद्रात सांभाळले जात आहेत. त्यापैकी काही बिबट्यांना अपुऱ्या जागेतील पिंजऱ्यात ठेवावे लागत होते. परंतू वनविभागाच्या विशेष निधीतून पाच रात्र आणि दिवस पिंजरे येथे नव्याने बांधण्यात आले आहेत. दिवस पिंजऱ्यात ते मुक्त संचार करु शकतात अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वनविभाग पुणे वृत्तचे मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांच्या हस्ते या पिंजऱ्याचे उद्धाटन करुन रात्र पिंजऱ्यात ठेवण्यात आलेले पाच बिबटे दिवस पिंजऱ्यात मुक्त करण्यात आले. जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे, सहाय्यक वनसंरक्षक वाय.पी.मोहीते, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय पिसाळ, बिबट्या निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख सहाय्यक महेंद्र ढोरे तसेच वनकर्मचारी,विविध माध्यमांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या बिबट्यांचे दिवसरात्र पिंजऱ्यात स्थलांतर करण्यात आले. यावेळी काही बिबट्याने आरोळी ठोकून आनंद व्यक्त केला.

Web Title: Marathi news pune enws junnar manikdoh leopard separate home