महिला दिनानिमित्त महिलांची हिमोग्लोबिन तपासणी

राजकुमार थोरात
शुक्रवार, 9 मार्च 2018

वालचंदनगर (पुणे) : ग्रामीण भागातील महिलांना सक्षम करण्यासाठी प्रत्येक कुंटूबातील पुरुषांनी महिलांना प्रोत्साहन देूऊन त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहण्याची गरज असल्याचे मत भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे यांनी व्यक्त केले.

लासुर्णे (ता.इंदापूर) येथे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते. यावेळी भारतीय जनता पार्टीचे इंदापूर  तालुक्याचे विस्तारक विपूल महाजन, नानासाहेब नरूटे, राजेंद्र वाकसे, गणेश सूळ , हनुमंत निंबाळकर, शाळेच्या मुख्याध्यापिका मंगला पवार, मंगला मुळीक, शालन सोनवणे, तुकाराम ठोंबरे, फिरोज मुलाणी, मच्छिंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी वाकसे यांनी सांगितले की, चूल व मूल संकल्पनेतुन आज ग्रामीण भागातील महिला बाहेर पडून पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन लढत आहेत. अनेक महिला स्वत:च्या पायावरती उभ्या राहुन कुंटूबाला हातभार लावत आहेत. ग्रामपंचायतीच्या सरपंचापासुन देशाच्या सरंक्षण खात्याची जबाबदारी महिला यशस्वीपणे पार पाडत आहेत.

ग्रामीण भागातील महिलांना कुंटूबातील पुरुषांनी प्रोत्साहन दिल्यास त्या कोणत्याही क्षेत्रामध्ये सहज भरारी घेऊ शकत असल्याचे सांगितले. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्राथमिक शाळेच्या शिक्षीका, अंगणवाडी सेविका व  मदतनिस, आरोग्य विभागातील महिलांचा भाजपच्या वतीने हिमोग्लोबिनची मोफत तपासणी करुन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिल भोसले यांनी केले

Web Title: Marathi news pune enws valchandnagar hemoglobin test on womens day