खिशाला चाट न बसता फॅशन

ऋतुजा हगवणे
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे - ‘‘अगं... नेहा लग्नाची जोरदार तयारी दिसतेय. संगीत, मेंदी, पार्टी या कार्यक्रमांसाठीच्या कपड्यांची मस्त निवड केलीस गं तू, आणि ते पण सगळे चालू ट्रेंडमधील कपडे... व्वा क्‍या बात! बराच खर्च आला असेल ना?’’ 

‘‘छे गं अक्षदा, मी या वेळी कपड्यांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळला आहे... मी भाड्याने भरजरी कपडे घेतले आहेत. यामुळे पैसे वाचल्याचे समाधानही मिळाले आणि फॅशनेबल कपड्यांची हौसदेखील भागली.’’

पुणे - ‘‘अगं... नेहा लग्नाची जोरदार तयारी दिसतेय. संगीत, मेंदी, पार्टी या कार्यक्रमांसाठीच्या कपड्यांची मस्त निवड केलीस गं तू, आणि ते पण सगळे चालू ट्रेंडमधील कपडे... व्वा क्‍या बात! बराच खर्च आला असेल ना?’’ 

‘‘छे गं अक्षदा, मी या वेळी कपड्यांवर होणारा अनावश्‍यक खर्च टाळला आहे... मी भाड्याने भरजरी कपडे घेतले आहेत. यामुळे पैसे वाचल्याचे समाधानही मिळाले आणि फॅशनेबल कपड्यांची हौसदेखील भागली.’’

भार्गवच्या नवीन व्यवसायाच्या उद्‌घाटनाचा कार्यक्रम होता, पण त्याच्याकडे कार्यक्रमाला शोभतील असे कपडे नव्हते. उद्‌घाटनाच्या वेळी ब्लेझर घालावा, अशी भार्गवची मनोमन इच्छा होती. परंतु, ब्लेझर घेणे त्याला परवडणारे नव्हते. त्याच्या मित्राने त्याला भाडेतत्त्वावर ब्लेझर घेण्याचा सल्ला दिला आणि कमी पैशांमध्ये भार्गवची हौस भागली.’’ 

फॅशन हा अनेकांसाठी जिव्हाळ्याचा विषय असतो. हौसेला मोल नसते त्यामुळे विशेषतः तरुण फॅशनबाबत खिशाचा विचार करत नाहीत. पण आता फार खर्चात न पडता नवनव्या फॅशन करणे शक्‍य होणार आहे. असे ड्रेस भाडेतत्त्वावर उपलब्ध होत आहेत. यामुळे वेळ नुसती मारून नव्हे, तर भारून नेता येत असल्याचे पटल्याने तरुणाईला हा नवा ट्रेंड आकर्षक वाटतो.

लग्न, पार्टी, सण-समारंभ तसेच प्री वेडिंग फोटोशूट अशा समारंभासाठी महागडे कपडे घेतले जातात. जास्त वापर नसल्यामुळे ते नंतर पडून राहतात. असे महागडे कपडे घेणे आवाक्‍याबाहेरदेखील जाते. असे पार्टीवेअर कपडे भाडेतत्त्वावर मिळाले तर? पुण्या-मुंबईसारख्या शहरात आता हे सहज शक्‍य झाले आहे. 

भाडेतत्त्वावर कपडे खूप आधीपासून मिळतात. पण ते नाटक, नाटकातील पात्रे यासाठीच मिळत होते. आता त्याचे स्वरूप बदलले आहे. सण-समारंभासाठी पार्टीवेअर कपडे भाडेतत्त्वावर घेतले जातात. फॅशननुसार कपडे मिळत असल्यामुळे त्यांची मागणी वाढत आहे.  

ठिकठिकाणी बुटिक
लेहंगा, पार्टीवेअर गाउन्स, भरजरी पंजाबी सूट, नऊवारी, घागरा चोली, उंची साड्या यांना विशेष मागणी आहे. असे कपडे भाडेतत्त्वावर देणारी अनेक बुटिक ठिकठिकाणी सुरू झाली आहेत. 

ग्राहकांचा प्रतिसाद
भरजरी कपडे भाडेतत्त्वावर पुरविणाऱ्या मृदुल नेवसकर म्हणाल्या, ‘‘परवडण्यासारख्या या पर्यायाला ग्राहकांची पसंती आहे. ड्रायक्‍लीन करताना पॉलिशसुद्धा केले जाते. त्यामुळे त्यांची चमक नव्यासारखीच राहते.’’ नेहा गुप्ता म्हणाल्या, ‘‘आम्ही स्वतः ड्रेस डिझाईन करतो. कपड्यांची किंमत ५० ते ६० हजारांपर्यंतही असते. असे कपडे आम्ही एक दिवसासाठी दहा टक्के भाडे आकारून देतो. त्यापुढील दिवसांनुसार भाडे ठरते. ’’

Web Title: marathi news pune Fashion