पिंपळे सौदागर येथील उद्यानाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्याची मागणी

मिलिंद संधान
बुधवार, 10 जानेवारी 2018

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील शिवार रोडवरील नव्याने विकसित होत असलेल्या उद्यानाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात येण्याची मागणी स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे. रोझलँड रेसिडेन्सी सोसायटी शेजारील स. नं. १३०, १३२, १३३, १३४ मधील महानगरपालिका उद्यानांसाठी आरक्षण क्र. ३७१ ब प्रमाणे २ हेक्टर जागेत प्रशस्त उद्यान तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळे सौदागर येथील हे सर्वात मोठे व सर्व सोयींनी युक्त असे उद्यान होणार आहे.

नवी सांगवी - पिंपळे सौदागर येथील शिवार रोडवरील नव्याने विकसित होत असलेल्या उद्यानाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात येण्याची मागणी स्थानिक नगरसेवक नाना काटे यांनी केली आहे. रोझलँड रेसिडेन्सी सोसायटी शेजारील स. नं. १३०, १३२, १३३, १३४ मधील महानगरपालिका उद्यानांसाठी आरक्षण क्र. ३७१ ब प्रमाणे २ हेक्टर जागेत प्रशस्त उद्यान तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. पिंपळे सौदागर येथील हे सर्वात मोठे व सर्व सोयींनी युक्त असे उद्यान होणार आहे. यामध्ये वैशिष्ट्य पूर्ण कारंजे, लहान मुलांसाठी खेळायचे हिरवळ युक्त मैदान, जॉगिंग ट्रँक, हास्य क्लब परिसर, मिनी ट्रेन, ध्यानधारना करण्यासाठी जागा, रंगी बेरंगी छोटे रोपटे, हस्त कला दालन, बोटिंग सहल केंद्र अशी अनेक सोयींनी युक्त उद्यान साकारण्यात येत आहे.

या उद्यानामुळे पिंपळे सौदागरच्या नैसर्गिक सौंदर्यात आणखी एक भर पडणार आहे. तेव्हा या उद्यानाला राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे नाव देण्याची मागणी नगरसेवक नाना काटे यांनी ड प्रभाग समिती सभेमध्ये अध्यक्षांना पत्र देऊन केली आहे.

Web Title: marathi news pune garden rajmata jijaau