शाळेची सुरक्षितता वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

रात्रीच्यावेळी मदयपींचा अड्डा या शाळेच्या मैदानात भरतो. याठिकाणी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणे आवश्यत आहे. 

हडपसर - महापालिकेच्या महात्मा फुले माध्यमिक शाळा गाडीतळ या शाळेच्या मागील बाजूच्या संरक्षक भिंतीला मोठे भगदाड पडले आहे. त्यामुळे टवाळखोर या बोगदयातून शाळेच्या परिसरात प्रवेश करतात.  

पालक राहूल करंजे म्हणाले. हि मुलींची शाळा आहे. बाहेरील मुले या मार्गाने आत येवून वर्गात दगड मारणे, मुलींची छेडछाड करणे, मदयपान करणे यासारखे उदोयग करतात. भिंत बांधण्यासाठी हडपसर-मुंढवा सहाय्यक आयुक्त कार्यालयाला पत्रही दिले आहे. तरीही १ महिना उलटून गेली तरी प्रशासनाने कोणतीच दखल घेतलेली नाही. केवळ बेटी बचाओ बेटी पढाओ म्हणून काय उपयोग आहे का. जर आपण त्यांच्या सुरक्षेतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणार असेल तर आपण असे नारे देण्यात किंवा तसे समाज प्रबोधणं करण्यात काय अर्थ आहे. याठिकाणी दोन सुरक्षारक्षक आहेत. कधी ते असतात, नसतात. त्यामुळे रात्रीच्यावेळी मदयपींचा अड्डा या शाळेच्या मैदानात भरतो. याठिकाणी सुरक्षारक्षकांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. 

याबाबत हडपसर विभाग शिक्षण विभागाचे सहाय्यक प्रशासकीय अधिकारी सुरेश उचाळे म्हणाले, संबधित ठिकाणी तातडीने पाहणी करण्यात येईल. दोन दिवसात पाठपुरावा करून सिमा भिंतीची दुरूस्ती केली जाईल.

 

Web Title: marathi news pune hadapsar pmc school wall hole