फक्त ३३ टक्के पुणेकरांना डोक्‍याची काळजी!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

पुणे - शहरांतर्गत प्रवास करताना फक्त ३३ टक्के दुचाकीस्वार नियमितपणे हेल्मेट घालतात, तर निम्म्याहून अधिक चालक हेल्मेटविना गाडी चालवीत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळले आहे. प्रवास कितीही अंतराचा असला, तरी नेहमी हेल्मेट वापरत असल्याचे चालकाच्या मागे बसणाऱ्या २० टक्‍क्‍यांहून अधिक जणांनी सांगितले. तसेच ‘हेल्मेट नसलेल्या व्यक्तींना लिफ्ट देऊ,’ असे केवळ १० टक्के पुणेकरांनी सांगितले आहे. ‘एक्‍साइड लाइफ इन्शुरन्स’ने नुकत्याच जाहीर केलेल्या सर्वेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. 

देशातील रस्त्यांवर दर पाच मिनिटाला एक मृत्यू होत असल्याचे आकडेवारीतून दिसून येते आणि २०२० पर्यंत हे प्रमाण दर तीन मिनिटाला एक मृत्यू इतके वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. चांगल्या दर्जाचे हेल्मेट घातल्यास चालक अपघातातून बचावण्याची शक्‍यता ४२ टक्के वाढते आणि चालकांना होणारी दुखापत ६९ टक्के कमी होऊ शकते, असे संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या एका अभ्यासात नमूद केले आहे. 

कंपनीचे विपणन संचालक मोहित गोयल म्हणाले, ‘‘गैरसोय व खर्च या कारणांनी हेल्मेट वापरत नसल्याचे अनेक नागरिकांनी सांगितले. रस्ते सुरक्षेच्या बाबतीत चालक वापरत असलेला चुकीचा तर्क या सर्वेक्षणातील निष्कर्षांमुळे समोर आला.’’

Web Title: marathi news pune helmet