‘हायपरलूप’मध्ये पुण्याची आघाडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

पुणे - अत्यंत वेगवान सार्वजनिक वाहतूकव्यवस्था असलेल्या ‘हायपरलूप’चा प्रकल्प जगभरात तीन ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुण्याचा समावेश आहे. अन्य दोन ठिकाणी हा प्रकल्प चर्चेत असताना पुण्याने यात आघाडी घेतली आहे. याच गतीने प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास हायपरलूपचा पहिला ‘पॉड’ पुणे-मुंबई मार्गावर ‘फायर’ होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

पुणे - अत्यंत वेगवान सार्वजनिक वाहतूकव्यवस्था असलेल्या ‘हायपरलूप’चा प्रकल्प जगभरात तीन ठिकाणी राबविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यात पुण्याचा समावेश आहे. अन्य दोन ठिकाणी हा प्रकल्प चर्चेत असताना पुण्याने यात आघाडी घेतली आहे. याच गतीने प्रकल्पाला मान्यता मिळाल्यास हायपरलूपचा पहिला ‘पॉड’ पुणे-मुंबई मार्गावर ‘फायर’ होईल, असा विश्‍वास व्यक्त करण्यात येत आहे.

जगातील अमेरिका, रशिया, दुबई या देशांमध्ये हायपरलूपच्या प्रकल्प चर्चेत आहेत. त्यातील दुबई ते आबुधाबी या मार्गावर ‘हायपरलूप’चे काम प्रगतिपथावर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, तेथील हायपरलूपचा वापर माल वाहतुकीसाठी होणार आहे. तर, इतर दोन देशांमध्ये तो प्रवासी वाहतुकीसाठी करण्याचा विचार आहे. याचबरोबर चेन्नई ते बंगळूर, आंध्र प्रदेश आणि पुणे येथेही हापरलूप प्रकल्प होत आहे. त्यात व्यवहार्यता अहवाल करण्यापर्यंत पुण्याने आघाडी घेतली आहे. त्यामुळे हायपरलूपच्या जागतिक प्रवासाची सुरवात या मार्गावरून होईल, अशी आशा निर्माण झाली आहे. 

कंपनीसमवेत करार
पुणे ते मुंबई या मार्गावरील हायपरलूपच्या पूर्वव्यवहार्यता अहवालाच्या (प्री-फिझिबिलिटी रिपोर्ट) यशस्वितेनंतर आता राज्य सरकारने हा प्रकल्प यशस्वी करण्याच्या दृष्टीने ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ कंपनीसोबत इरादा करार केला आहे. त्यामुळे पुणे-मुंबई हा प्रवास अवघ्या तीस मिनिटांमध्ये पूर्ण करता येणार आहे. या प्रकल्पाचा व्यवहार्यता अहवाल (फिझिबिलीटी रिपोर्ट) आता तयार करण्यात येणार आहे. या मार्गावरील नेमक्‍या कोणत्या भागात दहा ते पंधरा किलो मीटरचा चाचणी मार्ग उभारावा, याची हे अहवालात नमूद करण्यात येणार असल्याची माहिती पुढे आली आहे. तो हायपरलूपचा जगातील पहिला चाचणी मार्ग ठरणार आहे. याबाबत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) आयुक्त किरण गित्ते म्हणाले, ‘‘अमेरिकेतील लास वेगास येथे २०१६ पासून हायपरलूपच्या वेगवेगळ्या चाचण्या घेण्यात येत आहेत. त्यासाठी तेथे पाचशे मीटरच्या लांबीचा प्रायोगिक मार्ग तयार करण्यात आला आहे. प्रतिकिलोमीटर ३८० वेग गाठण्यात त्यांना यश आले आहे. यात सुधारणा करून हा वेग एक हजार किलोमीटर प्रतितासापर्यंत वाढविण्यात येत आहे. लास वेगासमधील हा मार्ग चाचणीसाठी उपलब्ध आहे. या चाचणी मार्गावरून प्रवाशांची प्रत्यक्ष ये-जा होणार आहे. त्यामुळे पुणे-मुंबईदरम्यान नेमक्‍या कोणत्या भागात हा दहा ते पंधरा किलोमीटर लांबीचा चाचणी मार्ग निर्माण करायचा, याची माहिती व्यवहार्यता अहवालातून पुढे येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट  केले.’’

व्हर्जिन हायपरलूप वन कंपनीकडून व्यवहार्यता अहवाल सरकारला सादर केला जाईल. त्याला मंजूर मिळाल्यानंतर ‘डिझेल प्रोजेक्‍ट रिपोर्ट’ (डीपीआर) तयार करण्यात येणार आहे. त्यानंतर खरेदी, परवानग्या, ना-हरकत प्रमाणपत्र आणि प्रत्यक्ष काम यासाठी पुढील दोन ते अडीच वर्षांचा कालावधी लागेल. त्यामुळे २०२१ पर्यंत हा पहिला चाचणी मार्ग खुला होण्याची शक्‍यता आहे.
- किरण गित्ते,  आयुक्त, पीएमआरडीए 

 तिकिटाचा संभाव्य दर - प्रतिप्रवासी दीड हजार रुपये 
  वेग - एक हजार किलोमीटर प्रतितास
  खर्च - अंदाजे खर्च तीन लाख ५० हजार कोटी रुपये
 प्रवासी वाहतूक क्षमता - एका तासात दहा हजार प्रवाशांची वाहतूक शक्‍य
 प्रदूषण नियंत्रण - प्रतिवर्षी एक लाख ५० हजार टन हरित वायुउत्सर्जन कमी होईल

अर्ध्या तासात मुंबई  
हायपरलूपचे पॉड रिक्षासारखे असतात. त्यात एका वेळी पन्नास जण बसू शकतात. त्यातून तो पॉड फायर केल्यानंतर ती ट्यूब अर्ध्या तासात पुण्याहून मुंबईला पोचेल. 

Web Title: marathi news pune Hyperloop