सभासद व्हा अन्‌ मिळवा ‘वैश्र्विक खाद्यसंस्कृती’ पुस्तक

सभासद व्हा अन्‌ मिळवा ‘वैश्र्विक खाद्यसंस्कृती’ पुस्तक

पुणे - संपूर्ण वर्षभर सांस्कृतिक आणि आरोग्यविषयक कार्यक्रमांची रेलचेल असणाऱ्या मधुरांगण परिवाराचे नव्याने सदस्य होणाऱ्यांना मायमिरर पब्लिशिंग हाउस प्रकाशित आणि विष्णू मनोहर लिखित ‘वैश्र्विक खाद्यसंस्कृती’ हे १९५ रुपये शुल्क असलेले पुस्तक उद्यापासून (ता. १९) स्‍टॉक असेपर्यंत भेट म्हणून मिळणार आहे.

विष्णू मनोहर हे सुप्रसिद्ध शेफ असून, गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ खाद्य व्यवसायामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी ३०० हून अधिक ‘लाइव्ह कुकरी शोज्‌’ केले आहेत. भारताबरोबरच सिंगापूर, दुबई, कतार आणि नेपाळमध्येही त्यांनी ‘कुकरी शोज्‌’ केले आहेत. त्यांनी केलेल्या पाच फूट रुंद आणि पाच फूट लांब तसेच ४५ किलो वजनाच्या पराठ्याची ‘लिम्का रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे. अनेक फेस्टिव्हल्सचे आयोजन करून ते खवय्यांना सातत्याने नवनवीन रेसिपीज्‌ देतात. कलर्स मराठी वाहिनीवरील मेजवानी परिपूर्ण किचनच्या ३००० कार्यक्रमांद्वारे ते महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचले आहेत.

खाद्य संस्कृतीचे महत्त्व जाणणाऱ्या प्रत्येकाच्या घरात असायलाच हवे, असे उपशीर्षक असलेल्या ‘वैश्र्विक खाद्यसंस्कृती’ या पुस्तकात महाराष्ट्रापासून उत्तर प्रदेशपर्यंत तसेच श्रीलंकेपासून स्पेनपर्यंत अनेक राज्यांची तसेच देशांची खाद्यसंस्कृती कशी आहे, याबद्दल मनोरंजक माहिती दिली आहे. तसेच काही निवडक १५१ रेसिपीज्‌ही दिल्या आहेत. याबरोबरच कॉर्पोरेट पदार्थ, अन्नपदार्थांची रंगसंगती, यात्रेतील खाद्यपदार्थ, लज्जतदार मांसाहार, मुलांसाठी सकस आहार, कोको आणि चॉकलेट, आईस्क्रीमचा इतिहासही देण्यात आला आहे. काही राजकीय मंडळीच्या खाण्याच्या आवडी आणि त्यांच्या आवडीच्या पदार्थांच्या रेसिपीज्‌ही या पुस्तकात दिल्या आहेत. मायमिरर पब्लिशिंग हाउसतर्फे मनोज अंबिके यांनी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. याशिवाय मधुरांगणच्या सर्व सभासदांना विष्णू मनोहर यांचे जीवन उलगडून दाखवणारे मायमिरर पब्लिशिंग हाउस प्रकाशित ‘तुकडा तुकडा जिलेबी’ हे नवीन पुस्तक २५ टक्के सवलतीच्या दरात विष्णूजी रसोई, म्हात्रे पूल येथे मिळणार आहे.

अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क ः ८३७८९९४०७६, ९०७५०१११४२   

नोंदणीसाठी थोडेच दिवस शिल्लक
हजारो रुपयांची ‘फ्री व्हाउचर्स’ 
वार्षिक सभासदत्व शुल्क ९९९ रुपये 
नोंदणीनंतर सभासदांना ‘तनिष्का’च्या १२ अंकांसह १ हजार ४९९ रुपये किमतीच्या २३ पिसेसच्या मल्टिपर्पज सेटची भेट. (भेटवस्तूसाठी कृपया मोठी पिशवी आणावी.) 
नामवंत ब्रॅंड्‌सची हजारो रुपयांची फ्री गिफ्ट व्हाउचर व डिस्काउंट व्हाउचर भेट 
ऑनलाइनसाठी प्ले स्टोअरवर ‘madhurangan’ टाइप करा. ॲप डाउनलोड करूनही सदस्यत्व नोंदणी शक्‍य. 
पासवर्ड ६ ते ७ डिजिटचा असावा. 
कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व आणि रक्कम ऑनलाइन भरल्यास गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच. 
ॲपवरून नोंदणी करणाऱ्यांना सर्व भेटवस्तू १५ दिवसांनंतर मिळतील; अन्यथा ‘सकाळ’च्या बुधवार पेठ कार्यालयात संपर्क साधून सकाळी ११ ते सायं. ६ या वेळात भेटवस्तू नेता येतील. 
ॲपव्यतिरिक्त नोंदणीसाठी ः ‘सकाळ’ मुख्य कार्यालय, 
५९५, बुधवार पेठ, पुणे, येथे संपर्क साधावा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com