esakal | पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला हिरवा कंदिल
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

पुण्यातील शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोला हिरवा कंदिल

sakal_logo
By
योगिराज प्रभुणे

पुणे, ता ७ : पुणे महानगर क्षेत्र विकास प्रधिकरणाच्या (पीएमआरडीए) शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रोला केंद्र सरकारने अखेर सोमवारी हिरवा कंदील दाखविला.

ही मेट्रो सार्वजनिक-खासगी भागीदारीतून (पीपीपी) होणार आहे, अशी माहिती पीएमआरडीएचे आयुक्त किरण गित्ते यांनी सकाळ शी बोलताना दिली. 

ते म्हणाले, “आठ वर्षांनंतर देशात पीपीपी तत्त्वावर मेट्रो प्रकल्प करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पीएमआरडीए आणि संबंधित कंपनीमध्ये करारनामा झाला आहे. त्या करारनाम्याला केंद्राने मान्यता दिली असून या प्रकल्पासाठी १३०० कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी, हा मेट्रो मार्ग करारनाम्याच्या मसुद्यामध्येच अडकल्याचे वृत्त  'सकाळ'ने प्रसिद्ध केले होते. या मसुद्याला केंद्र सरकारकडून मान्यता मिळत नसल्याने निविदा काढूनही मेट्रो प्रकल्पाचे काम पुढे सरकत नव्हते.

दरम्यान, पुणे शहरामध्ये सध्या मेट्रोच्या पहिल्या मार्गाच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. कोथरुडमधील वनाजपासून रामवाडीपर्यंत या मेट्रोचा मार्ग असणार आहे.

कुणाचा किती वाटा?  
मेट्रो प्रकल्पासाठी एकूण अपेक्षित खर्च ८,००० कोटी रुपये
राज्य सरकारने मंजूर केलेला निधी ८१२ कोटी रुपये
केंद्र सरकारकडून अपेक्षित निधी १,३०० कोटी रुपये
उर्वरित खर्च संबंधित ठेकेदार कंपनी करणार  
loading image
go to top