कोथरूडमध्ये तरुणावर वार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

पुणे - वृद्ध महिलेच्या घराच्या दरवाजावर तलवार, कुऱ्हाडीचे घाव घालून दुचाकींची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या टोळक्‍याने एका तरुणावर तलवारीने वार केले. ही घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात घडली.

पुणे - वृद्ध महिलेच्या घराच्या दरवाजावर तलवार, कुऱ्हाडीचे घाव घालून दुचाकींची तोडफोड करून दहशत पसरविणाऱ्या टोळक्‍याने एका तरुणावर तलवारीने वार केले. ही घटना कोथरूडमधील शास्त्रीनगर परिसरात घडली.

याप्रकरणी शारदा कसबे (वय ६०, रा. कोथरूड) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून संजय गणपत मरे (वय २८, रा. शिरगाव, ता. मुळशी), रामा कुडले व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार, शुक्रवारी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास आणि रविवारी रात्री सात वाजता कसबे यांच्या शास्त्रीनगर भागातील घरावर मरे, कुडले व त्यांच्या साथीदारांनी तलवारी व कुऱ्हाडीने घाव  घातले. 

तसेच त्यांच्या दोन दुचाकी फोडून नुकसान केले. त्यांच्यापैकी एकाने ‘इथे फक्त मी एकटाच भाई आहे’, अशी धमकी देत आरडाओरडा केला. त्यानंतर या टोळक्‍याने शास्त्रीनगर भागातच राहणाऱ्या परशुराम मच्छिंद्र कांबळे (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड) यांच्यावर कुऱ्हाड व तलवारीने वार केले. त्यामध्ये कांबळे हे गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी परिसरातील लोकांना तलवारीचा धाक दाखवून पळवून लावले. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली.

Web Title: marathi news pune murder crime

टॅग्स