कॉपीच्या संशयावरुन मुलींचे कपडे उतरवून तपासणी केल्याचा धक्कादायक प्रकार

जनार्दन दांडगे
शनिवार, 3 मार्च 2018

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीच्या संशयावरुन पन्नासहुन अधिक मुलींचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आल्य़ाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कपडे उतरवून तपासणी करण्यात आलेल्या सर्व मुली या पृथ्वीराज कपुर मेमोरियल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्याच्या विद्यार्थीनी असुन, दहा मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालचे प्राचार्य विरेंद्र बावसस्कर व संस्थेच्या तीन महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयात बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीच्या संशयावरुन पन्नासहुन अधिक मुलींचे कपडे उतरवून तपासणी करण्यात आल्य़ाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कपडे उतरवून तपासणी करण्यात आलेल्या सर्व मुली या पृथ्वीराज कपुर मेमोरियल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्याच्या विद्यार्थीनी असुन, दहा मुलींच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिसांनी एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालचे प्राचार्य विरेंद्र बावसस्कर व संस्थेच्या तीन महिला कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

दरम्यान हा प्रकार बुधवारी (ता. 28) वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या परीक्षेदरम्यान हा प्रकार घडला असुन, एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालचे प्राचार्य विरेंद्र बावसस्कर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मात्र पालक व विद्यार्थीनी केलेला आरोप फेटाळुन लावला आहे. 

राज्य परीक्षा मंडळाने बारावीच्या परीक्षेसाठी लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपुर मेमोरियल हायस्कुल व एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्याल या दोन परीक्षा केंद्रांची निवड केलेली आहे. वाणिज्य विभागाच्या विद्याथ्यार्थ्यांसाठी एमआयटीचे कनिष्ठ महाविद्यालय निवडले गेल्याने, पृथ्वीराज कपुर मेमोरियल हायस्कुल व कनिष्ठ महाविद्याच्या सव्वाशेहुन अधिक विद्यार्थीनी मागील आठवडाभरापासुन परीक्षा देण्यासाठी एमआयटीत जात आहेत. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास विद्यार्थी व विद्यार्थीनी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन या विषयाच्या परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रात आले असता, एमआयटीच्या तीन महिला कर्मचाऱ्यांनी विद्यार्थीनींना एका खोलीत घेऊन, त्यांच्याकडे कॉपी आहेत का याची तपासणी करण्यास सुरवात केली. काहींनी केवळ चाचपून तर काहीनी थेट कपडे उतरवण्यास सांगण्यास सुरुवात केली. कॉपी तपासणीसाठी कपडे उतरवण्यास मुलींनी नकार देताच, तपासणी करण्याऱ्या तीन महिला कर्मचाऱ्यांनी कपडे उतरवून तपासणी करु न दिल्यास, एकालाही परीक्षेला बसु दिले जाणार नाही अशी धमकी देण्यास सुरुवात केली. या धमकीमुळे पन्नासहुन अधिक विद्यार्थीनी संबंधित तीन महिला कर्मचाऱ्यांना हवी तशी तपासणी करु दिली. मात्र घडलेल्या घटनेची माहिती परीक्षा संपल्यानंतर कांही मुलींना आपल्या पालकांना दिली. यावर वीसहून अधिक पालकानी शनिवारी (ता. 3) सकाळी अकरा वाजच्या सुमारास एकत्र येऊऩ, पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. 

या घटनेबद्दल पालकांच्या वतीने सकाळशी बोलतांना गणेश शितोळे म्हणाले, कॉपी होऊ नये यासाठी विद्य़ार्थीनींची तपासनी करण्यास कोणाचीही हरकत नव्हती. मात्र आत्तापर्य़ंत बारावीच्या झालेल्या चारही विषयांच्या परीक्षेदरम्यान कॉपी तपासनीच्या नावाखाली मुलींना विवस्त्र करुन, तपासणी करण्यात आल्याची माहिती मुलींनी आपापल्या पालकांना दिली आहे. कॉपी तपासणीच्या नावाखाली मुलींना विवस्त्र करणे ही बाब अंत्यत धक्कादायक आहे. काही मुली परीक्षेला जातांना रडत असल्याचे पाहुन, पालकांनी विश्वासात घेऊन विचारणा केल्यावर वरील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत मुली व पालकांच्या वतीने लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर यांच्या समवेत लोणी काळभोर पोलिसांना लेखी तक्रार दिली आहे. पोलिसांनी घडलेल्या घटनेची योग्य चौकशी करुन, या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे.

दरम्यान वरील घटनेबद्दल बोलतांना एमआयटीच्या कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विरेंद्र बावसस्कर म्हणाले, कॉपीच्या संशयावरुन पन्नासहुन अधिक मुलीचे कपडे उतरवुन तपासणी करण्यात आली हा आरोप चुकीचा आहे. असा कोणताही प्रकार घडलेला नाही. बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपी होऊ नये यासाठी सर्वच विद्यार्थ्यांची तपासणी करण्याच्या सुचना कर्मचाऱ्यांना दिल्या होत्या. या सुचनांच्या आधारे कर्मचाऱ्यांनी केवळ तपासनी केलेली आहे. एकाही विद्यार्थीनीला अथवा विद्यार्थ्याला कपडे काढायला लावण्यात आलेले नव्हते. एका विद्यार्थीनीकडे कॉपी सापडल्याने, आम्ही तीला समज दिली होती. त्याच विध्यार्थीनीच्या पालकाने कांही पालकांना एकत्र करुन, वरील आरोप आमच्यावर केलेला आहे. पोलिसांच्या कोणत्याही चौकशीस आम्ही तयार आहोत असेही बावसस्कर यांनी स्पष्ठ केले.

Web Title: Marathi news pune news 12th exam cloths remove students checking