पुण्यात 150 ठिकाणी मोफत 'वाय-फाय'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 26 जानेवारी 2018

मोफत वाय-फायची ही सुविधा सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केली जात आहे. त्यानंतर यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये बदल करून ते कायमस्वरूपी करण्याबाबत विचार केला जाणार आहे. तसेच सध्या 150 ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा देण्यात येत असली तरी लवकरच अनेक ठिकाणी ही सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.  

पुणे : महापालिका प्रशासन आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीकडून पुणेकरांसाठी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत वाय-फायची सुविधा दिली जात आहे. या सुविधेंतर्गत शहरातील 150 ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा दिली जात आहे. यामध्ये सरकारी कार्यालये, संग्रहालये, पोलिस ठाणे आणि उद्याने अशा एकूण 150 ठिकाणांचा समावेश आहे. 

याबाबतची माहिती महापालिका आयुक्त कुणाल कुमार आणि पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांनी दिली. यावेळी महापौर मुक्ता टिळकही उपस्थित होत्या. मोफत वाय-फायची ही सुविधा सध्या प्रायोगिक तत्वावर सुरु केली जात आहे. त्यानंतर यामध्ये काही त्रुटी असतील तर त्यामध्ये बदल करून ते कायमस्वरूपी करण्याबाबत विचार केला जाणार आहे. तसेच सध्या 150 ठिकाणी मोफत वाय-फायची सुविधा देण्यात येत असली तरी लवकरच अनेक ठिकाणी ही सुविधा सुरु करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.   

या मोफत वाय-फाय सुविधेची माहिती पुणे स्मार्ट सिटी फेसबुक पेजवरील 'इव्हेंट' या ऑप्शनमध्ये देण्यात आली आहे, अशी माहिती देण्यात आली आहे. 

Web Title: Marathi News Pune News 150 spots free wifi services pune