पुणे-मुंबई महामार्गावर अपघातात दोन जण ठार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मृतांपैकी एका नाव कळाले असून, दुसऱ्याचे राहुल नागरगोजे (वय 24 रा.बावधन पुणे) असे त्यांचे नाव आहे. तर लालाचंद यादव कंटेनर चालक कारमधील रवीप्रेम सिंग, अमन सिंग, दीपाचू भारद्वाज, आणि राजेंद्र चन्नोत अशी जखमींची नावे आहेत.

पिंपरी : पुणे-मुंबई महामार्गावर वडगाव मावळ येथे ब्राह्मणवाडी फाट्यावर कंटेनर आणि कार एकमेकांना धडकून झालेल्या भीषण अपघातात दोन जण ठार तर पाच जण गंभीर जखमी झाले. आज (बुधवार) पहाटे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. 

मृतांपैकी एका नाव कळाले असून, दुसऱ्याचे राहुल नागरगोजे (वय 24 रा.बावधन पुणे) असे त्यांचे नाव आहे. तर लालाचंद यादव कंटेनर चालक कारमधील रवीप्रेम सिंग, अमन सिंग, दीपाचू भारद्वाज, आणि राजेंद्र चन्नोत अशी जखमींची नावे आहेत.

दरम्यान, घटनास्थळी रुग्णवाहिकेसह वडगाव मावळ पोलिसांनी धाव घेत जखमींना खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. सर्व मृत आणि जखमी पिंपरी-चिंचवडमधील असून अद्याप काहींची ओळख अद्याप पटलेली नाही. प्राथमिक माहितीनुसार, डस्टर गाडी लिंबाजी नागरगोजे यांच्या नावाची असल्याची माहिती मिळाली आहे. वडगाव पोलिस पुढील तपास करीत आहे. 

Web Title: Marathi news Pune news 2 dead in accident