आदिवासी बांधवांना कपड्यांचे वाटप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 31 डिसेंबर 2017

टाकवे बुद्रुक - आंदर मावळातील फळणे, कुसवली, वाहनगाव, कांब्रे, डाहूली, कुसूर, खांडीतील कातकरी वस्ती व आदिवासी पाडयावर कपड्यांचे वाटप करण्यात आले. महिलांसाठी साड्या, पुरूषांना पॅन्ट शर्ट, मुलांना जिन्स टीशर्ट तर ज्येष्ठ नागरिकांना ऊबदार कपडे देण्यात आले. हिवाळ्याच्या कडक थंडीत मिळालेल्या कपडयांनी आदिवासी बांधवांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य फुलले. 

पिंपरीतील थीसेनक्रुप इंडस्ट्रीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने या उपक्रमाचे आयोजन केले होते. मागील तीन वर्षांपासून थीसेनक्रुप मार्फत हा उपक्रम घेतला जातो. सकाळने तीन वर्षांपूर्वी 'कडाक्याच्या थंडीत कुडकुडत दिवस काढणाऱ्या आदिवासी मायलेकर व बांधवांची बातमी प्रसिद्ध केली होती. त्याची दखल घेत दरवर्षी वेगवेगळ्या पाडयावर हिवाळ्यात कपडे वाटपाचा हा उपक्रम होत आहे. सणासुदीच्या पूर्वेला किंवा गावाच्या यात्रेपूर्वी मिळालेल्या कपड्यांना मोठी मागणी आहे. समाजातील सेवाभावी संस्था किंवा दानशूरांच्या मदतीने पाडयावर असे उपक्रम राबविण्याचा संकल्प थीसेनक्रुपचे कामगारनेते अनिल गोडसे यांनी केला. 'सकाळ'ने समाजातील उपेक्षित घटकाची समस्या मांडून त्याकडे लक्ष वेधले. त्यामुळे आदिवासी पाडयावर पोहचता आले असेही त्यांनी सांगितले. यावेळी सोमनाथ माने, संजीव येलगे, रवींद्र कामथे, ऋषिकेश जाधव, 'सकाळ'चे बातमीदार रामदास वाडेकर, आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष शेखर मालपोटे, गोरख मालपोटे उपस्थितीत होते. खरेदी-विक्री संघाचे संचालक मारुती खांडभोर यांनी प्रास्ताविक केले. काळूराम वाडेकर यांनी सुत्रसंचालन केले. पांडुरंग हिलम यांनी आभार मानले.  
 
Web Title: Marathi News Pune News Aadivasi Cloth distribution