मोटार अपघातात दोघांचा मृत्यू, मृत कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील

महेंद्र शिंदे
शुक्रवार, 2 मार्च 2018

खेड-शिवापूर - कात्रज नऱ्हे रस्त्यावर शुक्रवारी पहाटे मोटार लोखंडी टॉवरला धड़कल्याने झालेल्या अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर, दोन जण गंभीर जखमी असून, एक जण किरकोळ जखमी झाला आहे.

आशुतोष मोहन यादव (वय 35, रा. ता. वाळवा, जि. सांगली.) आणि निखिल दिलीप चौगुले (वय 30, रा. पन्हाळा, कोल्हापुर) अशी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत. चालक सुशांत पाटील (वय 25, रा. बेलवडे, कराड सातारा), धीरज शिंदे, ( भिलवडी वय 30), दिग्विजय महाजन (वय 24, ) हे तिघेही जखमी झाले आहेत. 

दत्तनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जण मित्र त्यांच्या मोटारीमधुन कात्रजहुन नऱ्हेकड़े निघाले होते. पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारास आंबेगाव येथील शिलाई शोरूम जवळील लोखंडी टॉवरला मोटार धडकली, त्यानंतर रस्त्याच्या कडेला सुमारे 25 फुट खड्डयात कोसळली. त्यात आशुतोष यादव आणि निखिल चौगुले या दोघांचा जागीच मृत्यु झाला. तर दोन जण गंभीर जखमी असून एक जणाला किरकोळ दुखापत झाली आहे.

Web Title: marathi news pune news accident