ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 9 जानेवारी 2018

मांजरी : महादेवनगर-मांजरी रस्त्यावर ट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने झालेल्या अपघातामध्ये एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला. सौरभ दिलीप टिळेकर (वय 22) असे (रा. महादेवनगर, मांजरी) असे मृत तरूणाचे नाव आहे. आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास जुन्या कालव्याशेजारी ही घटना घडली.

सौरभच्या उभ्या असलेल्या दुचाकीला पंधरा नंबर येथे दुसऱ्या दुचाकीने सकाळी धडक दिल्याने नुकसान झाले होते. त्याची दुरूस्ती करण्यासाठी तो ढेरे बंगल्याजवळील गॅरेजवर गेला होता. दुचाकी दुरूस्त झाल्यानंतर तो पुन्हा महादेवनगर येथील आपल्या घरी येत होता. त्याचवेळी मांजरीकडून येणाऱ्या ट्रकचा धक्का लागून तो खाली पडला. ट्रकचे मागील चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सौरभ येवलेवाडी येथील सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. हडपसर पोलिस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Marathi news pune news accident one young boy dies