पुणे-सातारा मार्गावर अपघातामुळे वाहतूक कोंडी

महेंद्र शिंदे
गुरुवार, 11 जानेवारी 2018

सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरीकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहेत. शिंदेवाड़ी आणि महामार्ग पोलिस सकाळपासुन वाहतूक नियोजनाचे काम करत आहेत.

खेड-शिवापूर : पुणे-सातारा रस्त्यावर शिंदेवाड़ी येथे गुरुवारी सकाळी दोन कंटेनरचा अपघात झाला. हे दोन कंटेनर बाजूला घेण्याचे काम सुरु असल्याने पुणे-सातारा रस्त्यावर दोन तासांपासून वाहतुकीची कोंडी झाली आहे. त्यामुळे शिंदेवाड़ी ते कात्रज नवीन बोगद्यापर्यंत सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. संपूर्ण वाहतूक सुरळीत होण्यास अजुन दोन तास लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

गुरुवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास शिंदेवाड़ी येथे पुणे-सातारा लेनवर पुढे चाललेल्या कंटेनरला दुसरा कंटेनरने पाठीमागुन धड़क दिल्याने अपघात झाला. 
सकाळी आठ वाजल्यापासून शिंदेवाड़ी पोलिस क्रेनच्या सहाय्याने हे कंटेनर बाजूला घेत असल्याने पुणे-सातारा लेन वरील वाहतूक थांबविण्यात आली आहे. त्यामुळे पुणे-सातारा लेनवर दोन तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. शिंदेवाड़ी ते कात्रज नवीन बोगद्याच्या बाहेर सुमारे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

अनेक बेशिस्त वाहन चालक शिंदेवाड़ी येथील सेवा रस्त्याने सातारा-पुणे लेनने वहाने नेत आहेत. त्यामुळे या भागातील सातारा-पुणे लेनवरही वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. 

सकाळच्या वेळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या नागरीकांना वाहतूक कोंडीत अडकावे लागल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहेत. शिंदेवाड़ी आणि महामार्ग पोलिस सकाळपासुन वाहतूक नियोजनाचे काम करत आहेत.

Web Title: Marathi news Pune news accident on Pune Satara road