पुणे - आहिरेगावच्या समस्येबाबत संरक्षण राज्यमंत्र्यांना निवेदन

राजेंद्रकृष्ण कापसे 
गुरुवार, 8 मार्च 2018

खडकवासला (पुणे) : राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनीच्या हद्दीलगत असलेल्या अहिरे गावाच्या वाड्यावस्त्यांच्या विविध मागण्यासंदर्भात केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी भेटून निवेदन दिले. यावेळी त्यांच्या समवेत आहिरेचे ग्रामस्थ माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष शुक्राचार्य वांजळे, नगरसेवक सचिन दोडके उपस्थित होते.

अहिरे गावाच्या वरच्या वाड्यावस्त्यांना जाण्या-येण्यासाठी आणि मनपा बस सेवेकरिता राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीने रस्ता वापरण्यास द्यावा. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या ताब्यात असलेले मैदान मुलांना खेळण्यासाठी मिळावे. राष्ट्रीय सरंक्षण प्रबोधिनीचे बरेच दिवस प्रलंबित असलेल्या विषयावर प्रबोधिनी व संरक्षण राज्यमंत्री यांच्या संयुक्तिक बैठकीची मागणी केली. ती मागणी मान्य करून लवकरात लवकर संरक्षण राज्यमंत्री भामरे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच पुण्यात बैठक घेण्यात येणार. संरक्षण राज्यमंत्री भामरे यांनी खासदार सुळे यांच्या मागण्यासंदर्भात योग्य दखल घेऊन स्थानिक नागरिकांची अडवणूक होणार नाही. याबाबत, भूमिका घेऊ असे सांगितले.
 
Web Title: Marathi news pune news ahiregao defense state minister request