महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा बदलते आहे - अजित पवार

ajit-pawar
ajit-pawar

बारामती (पुणे) : गुजरातच्या निवडणूकीपर्यंत उघडपणे बोलण्यास टाळणारे आयएएस व आयपीएस अधिकारी आता आम्हाला तुम्ही लवकर सत्तेवर या असे महाराष्ट्रात सांगत आहेत. सत्तेत अधिकाऱ्यांनाच बदल हवा आहे हे महाराष्ट्राच्या राजकारणाची हवा बदलते आहे याचेच द्योतक म्हणावे लागेल, असे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बोलून दाखविले.

बारामती तालुक्यातील सरपंच उपसरपंचांच्या सत्कार समारंभात आज ते बोलत होते. 
प्रशासनामध्येही अस्वस्थता दिसते. अनेक वरिष्ठ अधिकारी खाजगीत आता तुम्ही लवकर सत्तेवर या असे सांगतात, अधिकाऱ्यांना सन्मानाची वागणूक दिली जात नाही, मनमानी कारभार सुरु असून राज्याच्या तिजोरीत खडखडाट करण्याचे काम या सरकारने केले असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला.
 हल्लाबोल आंदोलनाच्या निमित्ताने मराठवाड्यात तर युवकांनी इतका भरभरुन प्रतिसाद दिला, रॅली व मिरवणूकांच्या निमित्ताने लोकांनी सत्ताबदलासाठी आमच्या मागे शक्ती उभी केल्याचे दिसले. पेट्रोल डिझेलच्या सततच्या किंमत वाढीने आणि एकूणच महागाईने लोक त्रासून गेलेले आहेत. 

शेतकरी, युवक, महिला, व्यापारी यांच्यासह समाजाचे सर्वच घटक सरकारच्या धोरणावर नाराज आहेत. पुणे व पिंपरी चिंचवडमध्येही आता अस्वस्थता जाणवू लागली आहे. नाना पटोले मध्यंतरी मला भेटले होते तेव्हा त्यांनीही आपली अस्वस्थता बोलून दाखविली. एकनाथ खडसे आणि नारायण राणे यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांची आज झालेली अवस्था दयनीय आहे. सर्वच आघाड्यांवर हे सरकार अयशस्वी ठरलेले आहे. 

तर गुजरातचे चित्र वेगळे असते..
संविधान रॅलीच्या निमित्ताने हार्दिक पटेलशी माझे बोलणे झाले असे सांगून अजित पवार म्हणाले, गुजराथमध्ये समविचारी पक्ष एकजूटीने एकत्र आले असते तर आजचे चित्र वेगळे पाहायला मिळाले असते असे हार्दिकने मला सांगितले. अर्थात या निवडणूकीनंतर सगळेच अनेक गोष्टी शिकले आहेत अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com