साखर कारखानदारी अडचणीत येण्याची भीती - अजित पवार

मिलिंद संगई
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

बारामती (पुणे) : केंद्र व राज्य सरकारला अनेकदा विनंती करुनही साखरेचा बफर स्टॉक केला जात नसल्याने येत्या काही दिवसात साखरेला चांगली किंमत मिळणार नसल्याने साखर कारखानदारी अडचणीत येण्याची भीती माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोलून दाखविली. बारामती तालुक्यातील सरपंच उपसरपंचांच्या सत्कार प्रसंगी ते बोलत होते. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वास देवकाते, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे, पक्षनिरिक्षक राहुल शेवाळे, तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, शहराध्यक्ष इम्तियाज शिकीलकर, महिलाध्यक्षा वनिता बनकर व अनिता गायकवाड यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. 

या प्रसंगी पुरस्कारप्राप्त सकाळच्या मोरगावच्या बातमीदार संगीता भापकर व सांगवीचे रामदास जगताप यांचाही अजित पवार यांच्या हस्ते सत्कार केला गेला. पवार म्हणाले, अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दीडपट हमीभावाचे गाजर सरकारने दाखवले आहे, अगोदर कर्जमाफी करता आली नाही, आज कांदा, द्राक्ष, उस, डाळींब कोणत्याच पिकाला शेतकऱ्याला भाव मिळत नाही, शेतकरी पार हवालदिल झाला आहे. काही दिवसांपूर्वी 3500 रुपयांची साखर आज 2800 रुपयांवर आल्याने साखर कारखानदारी अडचणीत आली आहे, एकीकडे उसाचे क्षेत्र अमाप तर दुसरीकडे भाव कोसळले अशा दुहेरी संकटात उस उत्पादक आहे. 

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही अनेकदा केंद्र व राज्य पातळीवर बफर स्टॉक करण्याबाबत सांगूनही केवळ आश्वासने दिली जातात असा आरोप पवार यांनी केला. या बाबत बैठका लावण्याचे आश्वासन मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांनी देऊनही यात फार काही होत नाही. पुणे जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून 210 कोटी रुपयांचे येणे आहे, या बाबत मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी बोलणे झाले असून या येणे बाकीचा पुणे जिल्हा परिषदेच्या आर्थिक बाबीवर विपरीत परिणाम होत असल्याचे आपण त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पैसे देण्याची ग्वाही दिल्याचे पवार म्हणाले. 

सरपंच व नगराध्यक्षांचे अधिकार वाढणार -
येत्या अधिवेशनात सरपंच व नगराध्यक्षांचे अधिकार अधिक वाढविण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती असून येत्या अधिवेशनात तसे बिल सभागृहात आणण्याचा प्रयत्न असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या बाबत पुरेशी माहिती घेऊन भूमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले. 

Web Title: Marathi news pune news ajit pawar sugar factory