आळेफाटा येथे तनिष्का व्यासपीठाच्या वतीने महिला दिन उत्साहात साजरा

अर्जुन शिंदे
गुरुवार, 8 मार्च 2018

आळेफाटा (पुणे) : आळेफाटा (ता. जुन्नर) येथे आज (ता. ८) तनिष्का महिला व्यासपीठाच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.      

आळेफाटा येथे भारत भवन मंगल कार्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त (ता. ८) येथील तनिष्का महिला व्यासपीठाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलमेच्या अनुदानित आश्रमशाळेच्या संचालिका गौरीताई बेनके होत्या.                                  

यावेळी तनिष्का महिला व्यासपीठाच्या वतीने नर्मदाबाई गडगे (आळेफाटा), हिराबाई खोंड (पिंपरी पेंढार), दीपाली बेल्हेकर (जिल्हा परिषद शाळा, पादीरवाडी) व साबळे (जिल्हा परिषद शाळा आळेफाटा) या महिलांचा त्यांच्या विशेष कार्याबद्दल साडी व वृक्षाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्योती डमाळे, नयनाताई डोके, सुरेखा वेठेकर, सुंदरताई कुऱ्हाडे, तनिष्का महिला व्यासपीठाच्या अध्यक्षा वृषाली नरवडे, तनिष्का सदस्या - पल्लवी मेहेर, नीलिमा पाटील - भुजबळ, ऋतुजा शेलार, सारिका शेलार, गीतांजली दळवी, नीता वाव्हळ, अपेक्षा कुऱ्हाडे, नीलम गुंजाळ, मंजुषा गांधी, वैशाली गडगे, रोहिणी लामखडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी केवळ दोन मुली असणाऱ्या मातांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी विनया मंडले हिचे स्त्रीच्या अस्तित्वाची जाणीव या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी गोल्डन ड्रॅगन फायटर कराटे व अडव्हेंचर क्लबच्या कराटे प्रशिक्षक दीपाली पोटे व पराग छल्लारे यांनी इतर प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांच्या मदतीने, उपस्थित महिलांना स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवीत स्वसंरक्षणाचे धडे दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक वृषाली नरवडे यांनी, तर सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन दीपाली पोटे यांनी केले.      

Web Title: Marathi news pune news alephata womens day celebration