मावळ तालुक्यात पशू पक्षांचे अकस्मित मृत्यू

animals
animals

टाकवे बुद्रुक : निसर्ग संपन्नतेने नटलेल्या मावळ तालुक्यातील पशू पक्ष्यांचे अकस्मितपणे होणारे मृत्यू सिंहावलोकन करावे लावणारे आहे. सिमेंट कॉक्रीटची वाढती जंगले, अवैध पद्धतीने होणारे उत्खनन, जंगलाची कत्तल, विविध प्रकल्पासाठी होणारे संपादन,त्यावर उभे राहणारे प्रकल्प यामुळे नैसर्गिकच वाताहात सुरू आहे, यावर वेळी बंदोबस्त न केल्यास जंगलातील पशू पक्ष्यांच्या आस्तित्वाचा प्रश्न पुढे येईल . रविवारी सायंकाळी सहाच्या सुमारास जांभूळगावात भेकराचा मृत्यू झाल्याचे आढळून आले, उशीरा वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मृत पावलेल्या भेकराचा पंचनामा करून शवविच्छेदन केले. 

सह्याद्रीच्या कडेपठार वरील गर्द वनराई आणि जंगलात भेकर,रानडुक्कर, ससे, कोल्हे यांचे मोठे अस्तित्व आहे, विशेषत आंदर मावळ व नाणे मावळाच्या मध्यावर असलेल्या साई वाऊंड कचरेवाडी डोंगरा पासून पुढे बोरवली, कांब्रे, डाहूली पठार आणि त्यापुढे खांडी सावळा परिसरात या प्रजाती मोठ्या प्रमाणावर आढळून येते आहे,या डोंगरावर पवनचक्क्या बसवून वीज निर्मिती केली जात आहे, अशीच वीज निर्मिती वरसूबाई डोंगरावर देखील पवनचक्क्या द्वारे होत आहे, डोंगर पठारावर देखील धनिकांनी मोठ्या प्रमाणावर जमीन खरेदी विक्री सुरू केली आहे.

माऊच्या मोरमारेवाडीतून सटवाईवाडीला जोडणाऱ्या पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम सुरू आहे, रस्त्याच्या कामासाठी म्हणा किंवा पवनचक्क्या कामासाठी अवजड यंत्राच्या मदतीने उत्खनन सुरू आहे, डोंगरावर अवजड वहानांची वर्दळ सुरू झाली आहे, वाहनांचा कर्णकर्कश आवाज मुक्या प्राण्यांपर्यत दहा वर्षा पासून सतत पडतो आहे, पर्यटकांच्या सह शिकार करणाऱ्यांची गस्त वाढली आहे, पिण्यासाठी पाण्याची असुविधा आहे. 

अशा विविध कारणांनी डोंगर पठारावरील पशुपक्षी सपाटी वर येऊ लागले आहेत, विशेषत्वाने धरणाच्या कडेला त्यांची वर्दळ सुरू आहे, डोंगरावरून खाली उतरलेले हे मुके प्राणी तार कंपाऊंड अडकून, पाण्यात पडून, वीजेच्या धक्क्याने किंवा काही वेळी स्थानिकांनी केलेल्या शिकारीतून बळी पडत आहे, जांभूळगावात मृत्यू पावलेले भेकर त्याचे साधे उदाहरण आहे. अशा घटना कित्येक वेळा घडलेल्या आहेत, वनविभागाच्या निदर्शनास ही बाब आली तर या मुक्या प्राण्यांचा पंचनामा होतो.

केवळ याच परिसरात जंगलात पशुपक्षी भटकत खाली येतात, असे नाही तर ही परिस्थितीती मावळच्या संपूर्ण ग्रामीण भागात आहे, सिमेंट कॉक्रीटच्या वाढत्या जंगलात पशुपक्षी तग धरीत नाही असेच म्हणावे लागेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com