नऊ शेतकऱयांना व एका शास्त्रज्ञास 'अंजीर रत्न' पुरस्कार

AnjrRatnaAward
AnjrRatnaAward

सासवड (पुणे) : अंजीर फळपिकात सुधारीत तंत्र वापरणे, अंजिराची टिकाऊ क्षमता वाढविणे, उत्पादकता वाढविणे व उल्लेखनिय कामगिरी अंजीरबागेत करण्याची दखल घेऊन यंदापासून अंजीर रत्न पुरस्कार अखिल महाराष्ट्र अंजीर उत्पादक आणि संशोधन संघाने सुरु केले. हे पुरस्कार 9 शेतकरी व एका शास्त्रज्ञास नुकत्याच झालेल्या अंजीर परिषदेत माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या हस्ते व राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखालील कार्यक्रमात दिले गेले. 

अंजीर उत्पादक आणि संशोधन संघाच्या वतीने अंजीर रत्न पुरस्कार दिलेले राज्यातील ठिकाण निहाय अंजीर उत्पादक शेतकरी पुढीलप्रमाणे - सीताराम लक्ष्मणराव देशमुख (लोहगाव, ता. जि. परभणी), अरुण निंबाजी देवरे (दाभाडी, जि. नाशिक), समीर मोहनराव डोंबे (खोर, ता. दौंड), समीर उत्तम काळे (काळेवाडी - दिवे, ता. पुरंदर), महादेव भगवान खेडेकर (गुरोळी, ता. पुरंदर), दिपक विनाय जगताप (निंबुत, ता. बारामती), संभाजी ज्ञानदेव पवार (वाल्हे, अडाचीवाडी, ता.पुरंदर), महादेव दगडू गोगावले (गोगलवाडी, ता. हवेली), अरुण दत्तात्रेय घुले (कुंजीरवाडी, ता. हवेली), शास्त्रज्ञ पुरस्कार - डॉ. विकास आत्माराम खैरे (कोडीत खुर्द, सध्या रा. पुणे). 

पुरस्कारात मानपत्र, सन्मानचिन्हाचा समावेश होता. काळेवाडी - दिवे (ता. पुरंदर) येथे पहीली अंजीर परिषद झाली. त्यात अंजीर संघास नेहमी सहकार्य करणारे आत्माचे संचालक सुनिल बोरकर, विशाल पुरंदर पतसंस्थेचे अध्यक्ष सौरभ शेखर कुंजीर, रोहन सतीश उरसळ, तसेच काळेवाडीत पाणी पुरवठा योजनेस पन्नास लाखांची मदत करणाऱया बाबा कल्याणी यांच्या कंपनीच्या लिना देशपांडे यांचाही गौरव परीषदेत झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com