तूप विक्रीच्या बहाण्याने नागरिकांना लुबाडणाऱ्या दोघांना अटक

संदीप घिसे 
गुरुवार, 8 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : गावरान तूप विक्रीचा बहाणा करीत नागरिकांना लुबाडणाऱ्या दोघा जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून दोन लाख 99 हजार 950 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. 

पिंपरी (पुणे) : गावरान तूप विक्रीचा बहाणा करीत नागरिकांना लुबाडणाऱ्या दोघा जणांना निगडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तीन गुन्हे उघडकीस आले असून दोन लाख 99 हजार 950 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. 

अशोक ऊर्फ कांट्या विश्‍वनाथ गंगावणे (वय 26, रा. विठ्ठलवाडी, ता. बारामती), अशोक ऊर्फ काळू नामदेव गंगावणे (वय 30, रा. बांदलवाडी, ता.बारामती) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात गस्त घालत असताना पोलिस नाईक फारुक मुल्ला यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, निगडी परिसरात नागरिकांना लुबाडणारे बारामती परिसरातील आहेत. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून बारामती येथून आरोपींना ताब्यात घेतले.

निगडी पोलिस ठाणे येथे आणून त्यांना विश्‍वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी तीन गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून दोन मोबाईल हॅन्डसेट, कपडे, दुचाकी, रोख 12 हजार 350, रुपये, तुपाच्या किटल्या व सोनाराकडून 70.560 ग्रॅम वजनाचे सोने असा ऐवज हस्तगत केला. तसेच वाकड येथील फसवणुकीच्या गुन्ह्यातील चार हजार 350 रुपये, तसेच निगडीच्या अन्य एका गुन्ह्यातील आठ हजार रुपये असा एकूण दोन लाख 99 हजार 950 रुपयांचा ऐवज हस्तगत केला. 

उत्तर विभागाचे अपर पोलिस आयुक्‍त प्रदीप देशपांडे, उपायुक्‍त गणेश शिंदे, सहायक आयुक्‍त सतीश पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलिस निरीक्षक (गुन्हे) शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, पोलिस कर्मचारी मंगेश गायकवाड, नारायण जाधव, फारुक मुल्ला, नितीन बहिरट, आनंद चव्हाण, मच्छिंद्र घनवट, स्वामिनाथ जाधव, जमीर तांबोळी, रमेश मावसकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली. 

ठाणे येथे सहायक निरीक्षक या पदावर काम करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचे कुटुंब निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत वास्तव्यास आहे. या कुटुंबासही आरोपींनी तूप विक्रीच्या बहाण्याने लुटले होते.

Web Title: Marathi news pune news arrest 2 pimpri cheating