पुणे - पिंपरी येथे महाविद्यालयात घुसून विद्यार्थ्यावर वार 

संदीप घिसे 
सोमवार, 12 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका विद्यार्थ्यावर दोन जणांनी महाविद्यालयात घुसून वार केले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी (ता. १२) सकाळी घडली.

पिंपरी (पुणे) : दोन दिवसांपूर्वी क्षुल्लक कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका विद्यार्थ्यावर दोन जणांनी महाविद्यालयात घुसून वार केले. ही घटना चिंचवड येथे सोमवारी (ता. १२) सकाळी घडली.

रुपेश राजेश गायकवाड (वय १७ रा. बळवंत कॉलनी चिंचवड) असे हल्ल्यात जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश हा फतेचंद जैन महाविद्यायात अकरावीमध्ये शिकत होता. रूपेशला वर्गातील एका विद्यार्थ्याने कागदाचे बोळे मारले होते. यावरून त्याचे वर्गातील त्या विद्यार्थ्यांशी शुक्रवारी भांडणही झाले होते. सोमवारी रूपेश सकाळी साडेसात वाजता  महाविद्यालयात आला. वर्गात तास सुरू असताना उशिरा आलेल्या एका विद्यार्थ्याने रुपेशला प्रिन्सिपलने बोलवले असल्याचे सांगितले. अचानक प्रिन्सिपलने बोलल्यामुळे शिक्षकांना याबाबत संशय आला व त्यांनी रुपेश सोबत आणखी एका विद्यार्थ्याला पाठवले.

रुपेशा प्रिन्सीपलच्या केबिनकडे जात असताना दबा धरून बसलेल्या त्या वर्गातील दोन विद्यार्थ्यांनी त्याच्यावर कोयत्याने वार केले या हल्ल्यात रुपेश गंभीर जखमी झाला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे महाविद्यालयात एकच खळबळ उडाली. जखमी रूपेश याला जवळच्या खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. चिंचवड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल कुबडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे महाविद्यालयात सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Web Title: Marathi news pune news attack on students pimpari college