बारामती कृषीउत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल धोंडिबा हिवरकर

मिलिंद संगई
गुरुवार, 18 जानेवारी 2018

बारामती : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनिल धोंडिबा हिवरकर तर उपसभापतीपदी बापट निवृत्ती कांबळे यांची आज एकमताने निवड करण्यात आली. बारामती बाजार समितीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. 

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या दोघांनी सभापती व उपसभापतीपदासाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्याकडे अजित पवार यांनी नावे पाठविली होती. त्यानुसार होळकर यांनी आज ही नावे जाहीर केली. सहाय्यक निबंधक एस.एस. कुंभार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते. 

बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचा देशात वेगळा नावलौकीक आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली या बाजार समितीचे कामकाज अधिक प्रभावीपणे होण्यासाठी येत्या काळात प्रयत्न करु अशी ग्वाही अनिल हिवरकर व बापट कांबळे यांनी निवडीनंतर दिली. संभाजी होळकर यांनीही या बाजार समितीचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालावे अशी अपेक्षा या वेळी व्यक्त केली. मावळते सभापती रमेश गोफणे, उपसभापती विठ्ठल खैरे, संस्थेचे सचिव अरविंद जगताप, पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, बारामती दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, जिल्हा परिषद सदस्य भरत खैरे, मर्चंटस असोसिएशनचे अध्यक्ष अमोल वाडीकर, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष धनवान वदक यांच्यासह अनेक मान्यवर य प्रसंगी उपस्थित होते. राजेंद्र बोरकर यांनी सूत्रसंचालन केले. 

Web Title: Marathi news pune news baramati krushi utpanna bajar samiti