बारामती एमआयडीसीतील प्रकल्प बाधितांना मिळाला न्याय

संतोष आटोळे
शनिवार, 20 जानेवारी 2018

शिर्सुफळ : बारामती एमआयडीसीसाठी सन 1987-88 मध्ये जमिनी अधिग्रहीत करण्यात आल्या; त्या जमिनीचा मोबदला म्हणून प्रत्येक शेतकऱ्याला 1 गुंठ्याचा भूखंड एमआयडीसीकडुन परतावा म्हणून दिला जातो.

मात्र प्रशासनाकडुन याबाबत टाळाटाळ केली जात होती.याबाबत भूपिडीतांसाठी कटफळ ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला होता. त्यास दै.सकाळच्या माध्यमातुन साथ मिळाली होती.या प्रयत्नांना यश आले. व गुरुवार (ता.18) रोजी एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख यांच्या उपस्थितीत बारामती येथील कार्यालयात लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना भूखंडाचे वाटप करण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांमधुन आनंद व्यक्त होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की,  बारामती एमआयडीसीसाठी सन 1987-88 मध्ये अधिग्रहीत करण्यात आली. मात्र ज्यांच्या जमिनी एमआयडीसी साठी गेल्या. त्यांना अद्यापही प्रकल्प बाधित शेतकरी या नियमानुसार एमआयडीसीकडून देण्यात येणारे एक गुंठ्याचे प्लाॅट देण्यात आले नव्हते. यामुळे यासाठी जमिनी देण्याऱ्या कटफळ, तांदुळवाडी, वंजारवाडी, रुई, गोजुबावी या भागातील शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत तात्काळ निर्णय घेऊन संबंधितांना प्लाॅट देण्याची मागणी करण्यात येत होती. तसेच याबाबत पाठपुरावा केला होता.

त्यास दै.सकाळने वेळोवेळी बातम्या प्रसिध्द करीत वाचा फोडली होती. याची दखल घेतली गेली. यामुळे प्रकल्प बाधीत शेतकऱ्यांच्या सुशिक्षित मुलांना उद्योग उभारण्य़ाची क्षमता असणाऱ्यांना संधी उपलब्ध होणार आहे. यामध्ये एमआयडीसीकडुन अधिक सकारात्मकता दाखवित प्रादेशिक अधिकारी संजय देशमुख यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांची सोय विचारात घेत पुणे येथे वाटपाचा कार्यक्रम न घेता बारामती येथे घेण्यात आला. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांची चांगली सोय झाली. त्याबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच वाटप केलेल्या भूखंडाना लाईट कनेक्शन, पाण्याची सोय व भूखंडांना अंतर्गत रस्ते लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी भूपिडीतांना भूखंड वाटप केल्याबद्दल सर्व शेतकऱ्यांच्या वतीने पुणे जिल्हा केमिस्ट अॅड ड्रॅगीस्ट असोसिएशन चे उपाध्यक्ष भारत मोकाशी, हरिभाऊ मोकाशी, जहागीर तांबोळी, कांबळे गुरुजी, पांडुरंग आटोळे यांनी आभार मानले व अधिकाऱ्यांचा सत्कार केला.यावेळी एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता अभिमन्यू आगवणे, उपअभियंता प्रकाश साळवी, मोजणीदार मनोज शिर्षे  यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: marathi news Pune News Baramati News Baramati MIDC