ज्ञानसागर गुरूकुलमध्ये विज्ञान प्रदर्शन, आनंदी बाजार

संतोष आटोळे
शुक्रवार, 2 मार्च 2018

शिर्सुफळ : सावळ (ता. बारामती) ज्ञानसागर गुरूकुलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विज्ञान दिन, आनंदी बाजार व मराठी राजभाषा दिन या तिन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

शिर्सुफळ : सावळ (ता. बारामती) ज्ञानसागर गुरूकुलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विज्ञान दिन, आनंदी बाजार व मराठी राजभाषा दिन या तिन्ही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. सर्व विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले.

गुरुकुलमधील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण व्हावा, यासाठी विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले होते. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी विज्ञानाचा आधार घेऊन आपली विविध उपकरणे सादर केली. यामधून विद्यार्थ्यांना विज्ञानाबद्दल आवड निर्माण होण्यास मदत झाली. तर आनंदी बाजारच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना पुस्तकीय ज्ञानाबरोबरच व्यवहारीक ज्ञान सुद्धा असणे गरजेचे आहे.

यातून विद्यार्थ्यांना नफा-तोटा, व्यवहार, नोटांचे आकलन, व्यापार, ग्राहकांशी कसे बोलावे, व्यवसायिक ज्ञान अशा अनेक गोष्टींचे ज्ञान प्राप्त होण्यास मदत झाली. या आनंदी बाजारात (भाजीमंडई) विद्यार्थ्यांनी खाद्यपदार्थ, वुह्या, पुस्तके, पार्लर साहित्य, घरगुती उपयोगी वस्तू, किराणा माल ,भाजीपाला अशा अनेक  वस्तूचे स्टाॅल यामध्ये लावण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांसह, पालक, शिक्षक, ग्रामस्थांनी खरेदी करकत विद्यार्थ्यांना  प्रोत्साहन दिले.

याशिवाय ज्ञानसागर गुरूकुल हे इंग्लिश मीडियम स्कुल असेल तरी ते इंग्रजी प्रमाणे मराठी भाषेला तितकेच महत्व आहे. कारण मराठी भाषेतुनच आपल्याला एकमेकांच्या भावना चांगल्याप्रकारे समजून शकतात.म्हणून या उद्देशाने या शाळेत मराठी राजभाषा दिन सुद्धा साजरा करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठीमधून गोष्टी, सुविचार, कथा, कविता, जोक्स यांचे सादरीकरण करण्यात आले व आपल्या मराठी भाषेविषयीचा आदर व अभिमान व्यक्त केला.

यावेळी  बारामती चेंबर ऑफ इन्टासिसचे अध्यक्ष धनंजय जामदार, बारामती एमआयडीसी मधील अग्निशामक ऑफिसर राधेश्याम सोनार, विजय मोचे, रावसाहेब आटोळे, मनोहर गावडे, शाळेचे अध्यक्ष सागर आटोळे, उपाध्यक्षा रेश्मा गावडे, सेक्रेटरी मानसिंग आटोळे, मुख्याध्यापक दत्तात्रय शिंदे , शिक्षकवृंद यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

Web Title: marathi news pune news baramati news Dnyansagar Gurukul