कटफळला चिमुकल्यांनी जिंकली उपस्थितांची मने

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

कटफळ (ता.बारामती) - येथील अजितदादा इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सर्व उपस्थितीतांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल तीस हजार रुपयांची बक्षिसे मिळविली.

कटफळ (ता.बारामती) - येथील अजितदादा इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये वार्षिक स्नेहसंमेलन विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर करीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले. यावेळी चिमुकल्यांनी सादर केलेल्या कलागुणांनी सर्व उपस्थितीतांची मने जिंकली. यावेळी विद्यार्थ्यांनी तब्बल तीस हजार रुपयांची बक्षिसे मिळविली.

येथील अजितदादा इंग्लिश मिडीयम स्कूल चे पाचवे वार्षिक स्नेहसंमेलन बारामती तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांच्या अध्यक्षखेतील व बारामती हाय-टेक टेक्सटाइल पार्कचे मुख्यकार्यकारी अधिकारी एम.बी.संकेश्वरकर, बारामती एमआयडीसीचे फायर ऑफीसर विजयकुमार मोटे, पंचायत समिती सदस्या लीलाबाई गावडे, बारामती च्या नगरसेविका शारदा मोकाशी, नानासाहेब मोकाशी, संगीता मोकाशी, कटफळच्या सरपंच सारिका मोकाशी, गोजुबवीच्या सरपंच प्रमिला आटोळे, हरिष कुंभरकर, कल्याण आटोळे, माणिक मोकाशी, लक्ष्मण झगडे,भारत मोकाशी, दादाराम झगडे, गणेश आटोळे, बबन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले..

या वेळी संकेश्वरकर यांनी एंडोमेंट बक्षिसांची सुरुवात करा असे आव्हान केले व स्वःता पाच हजार रुपयाचा धनादेश व ग्रंथालयासाठी दरमहा एक हजार रुपयांचा धनादेश संस्थेकडे सुपुर्द केला. याच आव्हानाला प्रतिसाद देत संस्थेचे विश्वस्त हरीश कुंभरकर यांनी देखील पाच हजार रुपयांचा धनादेश तर भारत मोकाशी यांनी दहा हजार रुपयांचे रोख बक्षिस दिले.

या वेळी सहभागी विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत या विषयावर नाटिका सादर केली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष संग्राम मोकाशी यांनी तर आभार मुख्याधापिक स्वाती आटोळे यांनी मांनले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महेंद्र मदने, नितीन झगडे, रणजित झगडे, सुरेश जाधव, केदार मोकाशी, यांसह सर्व शिक्षकांनी सहभाग घेतला.

Web Title: marathi news pune news baramati news school