कचर्‍यापासून खतनिर्मिती करत फुलविले टेरेस गार्डन!

मिलिंद संगई
शनिवार, 20 जानेवारी 2018

बारामती : एकीकडे कच-याच्या समस्येने सर्वांनाच हैराण केलेले असताना बारामतीतील काही महिलांनी मात्र कच-यापासून खतनिर्मिती करीत आपल्या बागा फुलविल्या आहेत.

बारामतीतील महिला सोसायटीमध्ये वास्तव्यास असलेल्या आशा नामदेव ढवळे यांनी आठ वर्षांपूर्वी 'सकाळ'च्या एका प्रशिक्षण शिबीरानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरविली. आज त्यांच्या नेतृत्वाखाली विद्या भंडारे, आशा धिमान, सविता पाटील, लीला झणझणे, सुरंगा गिरमे या सहा जणींनी एकत्र येत कच-यापासून खतनिर्मिती व जीवामृत तयार करत टेरेस गार्डन तसेच बाग सुंदर रित्या फुलविली आहे. 

स्वयंपाकघरातील प्रत्येक टाकून दिल्या जाणा-या वस्तूचा वापर करत त्यांनी झाडांची अधिक पोषक वाढ होण्यासाठी प्रयत्न केले. गेल्या काही वर्षांपासून त्या कच-याचा सदुपयोग करताना दिसतात. भाज्यांचे जे देठ फेकून दिले जातात ते मिक्सरमध्ये बारिक करुन त्यात पाणी घालून ते पाणी झाडांना देण्याचा प्रयोग असो व कुंडीत झाडे वाढविताना कच-याचा केलेला उपयोग असो, प्रत्येक ठिकाणी या महिलांची कल्पकता सहजतेने दिसून येते. 

घरातील प्रत्येक महिलेला कचरा ही मोठी समस्याच असते, मात्र या सहा जणींनी स्वच्छता राखत घरातील प्लॅस्टिक वगळता इतर सर्वच कच-याचा विविध कारणांसाठी उपयोग करुन घेतला आहे. पाणी, शेण, गोमूत्र, गूळ व बेसनपीठ तयार करुन त्या जीवामृत तयार करतात. हे जीवामृत झाडांना घातल्यावर झाडांना वेगळीच चकाकी येत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. त्यांनी खत तयार करण्याचीही प्रक्रिया विकसित केलेली असून हे खतही झाडांना उपयुक्त ठरत असल्याचा त्यांचा अनुभव आहे. 

इको फ्रेंडली हळदीकुंकू
या सर्वांनी पर्यावरण संतुलन कायम राखण्यासाठी यंदा संक्रांतीचे हळदीकुंकूही इकोफ्रेंडली केले. कोठेही पर्यावरणाचा –हास होईल अशा वस्तूंचा वापर केला नाही. शिवाय वाण म्हणून सर्वांना त्यांनी रोप दिल. हे रोप आपापल्या दारात लावून त्याचे झाड व्हावे ही त्यांची या मागील भावना. बारामतीच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी या सहाही महिलांचे कौतुक केले. त्यांचा हा प्रयत्न बारामतीतील प्रत्येक घरातील महिलांपर्यंत नेण्याचा प्रयत्न निश्चित करु अशी ग्वाही तावरे यांनी दिली.

Web Title: marathi news Pune News Baramati positive news