बारामतीत भिंतीवरील सुंदर चित्रांतून दिला जातोय स्वच्छतेचा संदेश

मिलिंद संगई
शनिवार, 20 जानेवारी 2018

बारामती : स्वच्छता राखण्याचा संदेश आता बारामतीतील भिंती देऊ लागल्या आहेत. शहर आपले आहे ते स्वच्छ ठेवा असा संदेश भिंतीवरील चित्रातून नागरिकांपर्यंत जाऊ लागला आहे. 

स्वच्छ सर्वेक्षण मोहिमेच्या निमित्ताने बारामती शहराच रुप हळुहळू बदलू लागल आहे. मुळातच सुंदर असणा-या या शहराचे सौंदर्य वाढविण्यासाठी आता जाणीवपूर्वक प्रयत्न सुरु झाले आहेत. 

स्वच्छ सर्वेक्षण अभियानाच्या निमित्ताने बारामतीत अनेक स्तरांवर स्वच्छतेसह सौंदर्यीकरणाचीही कामे सुरु झाली. यात ठळकपणे जाणवणारे काम होते ते विविध ठिकाणच्या भिंतीवर सुंदर चित्रांच्या सहाय्याने दिलेले स्वच्छतेचे संदेश.

बारामती नगरपालिकेसह क्रेडाई तसेच बारामती तालुका कला अध्यापक संघाच्या वतीने स्वच्छतेचे संदेश देणारी सुंदर चित्रे विविध ठिकाणच्या भिंतीवर सध्या वेगाने साकारत आहेत. 

नजरेला सुखावणारी व ख-या अर्थाने प्रत्येक वेळेस मनावर स्वच्छतेचा संदेश बिंबवणारी ही चित्रे बारामतीकरांना सुखावत आहेत. भिगवण रस्त्यावर नटराज नाट्य कला मंदीरापासून अशी चित्रे साकारण्यास प्रारंभ करण्यात आला असून म.ए.सो. विद्यालयाच्या भिंतीपर्यंत ही चित्रे या सलग भिंतीवर साकारणार असल्याचे मुख्याधिकारी मंगेश चितळे यांनी या वेळी सांगितले. 

क्रेडाई संस्थेच्या सदस्यांनीही या अभियानात या साठी सहकार्य केलेले असून काही सेवाभावी संस्थाही मदतीला आल्याचे ते म्हणाले. दरम्यान प्रत्येक नागरिकाने आपापल्या परिसराचे सुशोभिकरण केले किंवा रंगरंगोटी केली तर बारामती शहर अधिक स्वच्छ, सुंदर दिसेल अशी अपेक्षा नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे यांनी बोलून दाखविली. 

अनेक पातळ्यांवर स्वच्छता अभियानाबाबत काम सुरु असून आरोग्य विभागाने यात कमालीची मेहनत घेतल्याचे गटनेते सचिन सातव यांनी सांगितले. अपुरे मनुष्यबळ असूनही सर्वच अधिकारी व कर्मचा-यांनी मनापासून काम करुन शहर चकाचक केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

दरम्यान नागरिकांनी कचरा उघड्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता घंटागाड्यातूनच तो वर्गीकृत करुन जमा केल्यास नगरपालिकेस सहकार्य होईल, अशी अपेक्षा उपनगराध्यक्ष जय पाटील यांनी व्यक्त केली. 

स्वच्छता अभियानात सातत्य हवे...
नगरपालिकेच्या वतीने केले जाणारे स्वच्छता अभियान हे एका दिवसापुरते नसावे तर त्यात सातत्य हवे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. या अभियानाचे वेळापत्रक तयार करुन प्रभागनिहाय अभियान केल्यास त्याचा चांगला उपयोग होऊ शकेल व शहर कायमच स्वच्छ राहिल अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

Web Title: marathi news Pune News Baramati Street Art