बारामतीतील शिर्सुफळ, पारवडीमध्ये कडकडीत बंद

संतोष आटोळे
बुधवार, 3 जानेवारी 2018

शिर्सुफळ : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला बारामती तालुक्यातील पारवडी शिर्सुफळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शांती मार्च काढण्यात आला, यावेळी शिर्सुफळ येथेही काही वेळेसाठी रेल्वे रोखून निषेध व्यक्त करण्यात आला तर पारवडी गावामध्ये कडकडीत बंद पाळून रास्तारोको आंदोलन केले. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना करण्यास गेलेल्या नागरिकांवर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात गावोगावी होऊ लागला आहे. शिर्सुफळ व पारवडी  येथील व्यापाऱ्यांनी आज (ता.03) बाजारपेठा बंद ठेवल्या.

शिर्सुफळ : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ आयोजित महाराष्ट्र बंदला बारामती तालुक्यातील पारवडी शिर्सुफळ येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी शांती मार्च काढण्यात आला, यावेळी शिर्सुफळ येथेही काही वेळेसाठी रेल्वे रोखून निषेध व्यक्त करण्यात आला तर पारवडी गावामध्ये कडकडीत बंद पाळून रास्तारोको आंदोलन केले. कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभाला मानवंदना करण्यास गेलेल्या नागरिकांवर काही समाजकंटकांनी केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधात गावोगावी होऊ लागला आहे. शिर्सुफळ व पारवडी  येथील व्यापाऱ्यांनी आज (ता.03) बाजारपेठा बंद ठेवल्या. आज सकाळी पारवडी येथील नागरिकांनी बारामती-खडकी मार्गावर रास्तारोको आंदोलन केले तसेच महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन निषेध सभा घेतली. तर शिर्सुफळ येथे मोर्चा पुणे बारामती रेल्वे मार्गावर काही काळासाठी रेल रोको केला. तसेच मोर्चा काढून जुन्या ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन देत निषेध व्यक्त करण्यात आला.

 

Web Title: Marathi news pune news baramati strike