महिलांनी निरोगी राहण्यासाठी वेळ द्यायला हवा - सुनेत्रा पवार

मिलिंद संगई
शुक्रवार, 9 मार्च 2018

बारामती (पुणे) : बदलत्या जीवनशैलीमध्ये महिलांच्या आहाराच्या सवयीत बदल झाले आहेत, व्यायामाचा अभाव व नियमित तपासण्यांकडे दुर्लक्ष या बाबी गंभीर असून महिलांनी निरोगी राहण्यासाठी वेळ द्यायला हवा, अशी अपेक्षा एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली. 

एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया तसेच बारामती हॉस्पिटल यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त गुरुवारपासून (ता. 8) महिलांसाठी मोफत गर्भाशय तसेच स्तनांच्या कर्करोग तपासणी शिबीराचे बारामती हॉस्पिटल येथे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीराचे उदघाटन करताना पवार बोलत होत्या. 

येत्या शुक्रवारपर्यंत (ता. 16) सकाळी दहा ते दुपारी दोन व संध्याकाळी सहा ते आठ या वेळेत बारामती हॉस्पिटलमध्ये महिलांच्या कर्करोगाबाबतच्या तपासण्या विनामूल्य केल्या जाणार आहेत. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे, मीनाताई शहा, डॉ. दिलीप लोंढे यांच्यासह अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, घरातील महिला ठणठणीत असेल तर ते घर आनंदी व समाधानी असते, त्या मुळे महिलांनी आरोग्य तपासण्या नियमित करुन घ्याव्यात व कुटुंबातील प्रत्येक घटकासोबतच स्वआरोग्याची काळजी घ्यायला हवी. 

या प्रसंगी पौर्णिमा तावरे यांनीही महिलांनी कुटुंबासाठी जीवनजगत असतानाच आपली प्रकृती व्यवस्थित कशी राहिल या बाबत जागरुक राहायला हवे असे सांगितले. मीनाताई शहा यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. घरातील स्त्री जर धडधाकट असेल तर ते कुटुंबही निरोगी राहते, त्या मुळे महिलांनी काळजी घ्यायला हवी असे त्या म्हणाल्या.  

डॉ. प्राजक्ता पुरंदरे यांनी या प्रसंगी महिलांचे आरोग्य व घ्यायची काळजी या बाबत माहिती दिली. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर नियमित तपासण्या करुन घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.  डॉ. मुग्धा भगत यांनी आभार व्यक्त केले. महिलांसाठी विनामूल्य तपासणी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून अधिकाधिक महिलांनी याचा फायदा घ्यावा असे आवाहन डॉ. दिलीप लोंढे यांनी केले आहे.

Web Title: Marathi news pune news baramati sunetra pawar womens day