बारामती तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींसाठी मतदान , आज मतमोजणी

संतोष आटोळे
बुधवार, 27 डिसेंबर 2017

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेली सायंबाचीवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 15 ग्रामपंचायतीच्या मंगळावरी (ता.26) झालेल्या मतदानात सरासरी 85.52 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक 96.69 टक्के मतदान गाडीखेल ग्रामपंचायतीसाठी तर सर्वात कमी मतदान डोर्लेवाडी येथे 78.39 टक्के झाले आहे. अशी माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हनुमंत पाटील यांनी दिली. प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने मतदानाला सर्वत्र उत्साह दिसत होता. यासाठी 15 गावांमधुन 70 मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडली.

शिर्सुफळ : बारामती तालुक्यातील सोळा ग्रामपंचायतींपैकी बिनविरोध झालेली सायंबाचीवाडी ग्रामपंचायत वगळता उर्वरित 15 ग्रामपंचायतीच्या मंगळावरी (ता.26) झालेल्या मतदानात सरासरी 85.52 टक्के मतदान झाले. यामध्ये सर्वाधिक 96.69 टक्के मतदान गाडीखेल ग्रामपंचायतीसाठी तर सर्वात कमी मतदान डोर्लेवाडी येथे 78.39 टक्के झाले आहे. अशी माहिती  निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हनुमंत पाटील यांनी दिली. प्रथमच थेट जनतेतून सरपंच निवड होत असल्याने मतदानाला सर्वत्र उत्साह दिसत होता. यासाठी 15 गावांमधुन 70 मतदान केंद्रांच्या माध्यमातून मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकुण 44 हजार 909 मतदारांपैकी 38 हजार 407 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील काटेवाडी या गावामध्ये 5635 मतदारांन पैकी 4740 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये अजित पवार यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान केले. तर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब गावडे यांच्या पारवडी गावातही 4056 मतदारांपैकी 3628 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. किरकोळ वादावादी वगळता सर्वत्र शांततेत मतदान पार पडले. 

दरम्यान आज बुधवारी (ता. 27) बारामती एमआयडीसी येथील रिक्रेएश हॉल येथे मतमोजणी होणार आहे. प्रशासकीय पातळीवर मतमोजणीची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणुन पोलिस संरक्षणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे. अशी माहिती निवडणुक निर्णय अधिकारी तथा तहसिलदार हनुमंत पाटील यांनी दिली. 

बारामती तालुक्यातील मतदान झालेल्या ग्रामपंचायती, मतदार संख्या, झालेले मतदान, टक्केवारी खालील प्रमाणे - 

1) काटेवाडी - (5635) - (4740)  - (84.12)
2) डोर्लेवाडी - (5480) -  (4296) - (78.39)
3) पारवडी - (4056) - (3628) - (89.45)
4) कऱ्हावागज - (2691) - (2378) - ( 88.37)
5) धुमाळवाडी - (2343) -( 1854) - ( 79.13) 
6) करंजेपुल - (2230) - (1912) - (85.74)
7) आंबी ब्रु. - (1100) - ( 953) -( 86.64)
8) गुणवडी - (6408) - ( 5355) - (83.57)
9) गाडीखेल - (756) - ( 731) - ( 96.69)
10) पवईमाळ - (1481) - ( 1324) -( 89.40)
11) मान्नापावाडी - (3023) - ( 2712) - ( 89.71) 
12) सि. निंबोडी - (1742) - (1639) - (94.09)
13) मुढाळे - (4047)  - ( 3435) - ( 84.88)
14) चौधरवाडी - (720) - ( 642) - ( 89.17)
15) मेडद - (3197) - ( 2808) - ( 87.83)
एकुण - (44909) - ( 38407)- ( 85.52)

 

Web Title: Marathi news pune news baramati tal elections counting today