भाटघर धरणातून पाणीगळती नाही 

विजय जाधव
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

भोर - भाटघर धरणाच्या भिंतीतून कुठल्याही प्रकारची पाणीगळती होत नसून, धरण पूर्णपणे सुरक्षीत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे साहाय्यक अभियंता श्रेणी-१ विजय नलावडे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून धरणाच्या भिंतीतून पाणीगळती होत असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. 

भोर - भाटघर धरणाच्या भिंतीतून कुठल्याही प्रकारची पाणीगळती होत नसून, धरण पूर्णपणे सुरक्षीत असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे साहाय्यक अभियंता श्रेणी-१ विजय नलावडे यांनी दिली. मागील काही दिवसांपासून धरणाच्या भिंतीतून पाणीगळती होत असल्याच्या चर्चेला त्यांनी पूर्णविराम दिला. 

'सकाळ'च्या प्रतिनिधीने धरणाच्या पाणीगळतीबाबत व धोक्याबाबत जलसंपदा विभागाकडून सर्व माहिती जाणून घेतली. याबाबत अधिक माहिती देताना विजय नलावडे यांनी सांगितले की, धरणाच्या भिंतीवर दिसत असलेली पाण्याची गळती ही भिंतींमधून नसून वीजनिर्मितीकडे जाणा-या पाण्याच्या उसासासाठी ठेवलेल्या (एअरव्हेंट) दोन पाईपमधून होत आहे. हे पाईप धरण बांधतानाचे असून धरणाच्या भिंतींच्या आधार देण्यासाठी उभारलेल्या टेकाव्यात आहेत. पाईप ब्रिटीशकालीन 
असल्याने सध्या त्यामधून अत्यल्प प्रमाणात पाणीगळती होत आहे. १९२८ साली धरण बांधल्यानंतर १९७२ ते १९८२ या कालावधीत धरणाच्या  १ हजार ६२५ मीटर लांबीच्या भिंतींना ३१ आधार टेकावे बांधण्यात आलेले आहेत. त्यामुळे धरणाच्या भिंतींना कुठलाही धोका नाही. याशिवाय दरवर्षी दोन वेळा म्हणजे मान्सूनपूर्व मे महिन्यात आणि मान्सूनअखेल नोव्हेंबर महिन्यात धरणाचे स्टक्चरल ऑडीटही होत आहे. त्यामुळे धरणाला कुठलाही धोका नाही. 

धरणाच्या उसासासाठी ठेवलेल्या (एअरव्हेंट) पाईपच्या दुरुस्तीसाठी जलसंपदा विभागाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला असून त्याची मंजूरी आल्यानंतर ते काम हाती घेतले जाणार आहे. २३.७५ टी.एम.सी क्षमता असलेल्या भाटघर धरणात सध्या ७० टक्के म्हणजे १७ टी.एम.सी पाणीसाठा आहे. १० जानेवारीला धरणातून सोडण्यात येणारे पाणी १४ फेब्रुवारीला बंद करण्यात आले आहे. धरणावरील विद्युतनिर्मीती केंद्राच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून पुढील आठवड्यापासून बंद असलेली विजनिर्मिती पुन्हा सुरु होणार असल्याचेही श्री. नलावडे यांनी सांगितले. सगळं समजुन सांगते.

Web Title: marathi news pune news bhatghar dam