भीमाशंकर परिसर विकास आराखड्यासाठी १३९ कोटी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 डिसेंबर 2017

मुंबई : डी. के. वळसे पाटील, राज्याचे अर्थ वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली व विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या १३९ कोटी ४८ लाख रुपयांच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली आहे.

सह्याद्री अतिथिगृह मुंबई येथे गुरुवारी (ता. २८) बैठक झाली. या बैठकीमध्ये प्रकल्प आराखडा मान्यता देऊन सदर आराखडा उच्च अधिकार समितीकडे पाठविण्याबाबत मुनगट्टीवार यांनी आदेश दिले. भीमाशंकर परिसर विकास आराखड्याच्या कामाचा पाठपुरावा वळसे पाटील हे सातत्याने करत आहे. सहा महिन्यापूर्वी मुनगट्टीवार यांनी श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भेट देऊन नियोजित कामांची पाहणी करून विकास आराखडा तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले होते.

 श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिराच्या सभागृहाचे काम नव्याने करणे, प्रशस्त प्रवेशद्वार उभारणे, पायरी मार्ग सुधारणा करणे, भक्तांसाठी मंदिर परिसरात बांधकाम करणे, भीमानदी उगमस्थान व कुंडाचे सुशोभीकरण करणे, पोलीस ठाणे इमारत व पोलीस कर्मचारी निवास बांधकाम, एस. टी. बसस्थानक व परिसर सुधारणा करणे, भीमाशंकर परिसर पाच वाहन तळ उभारणे, पिण्यासाठी शुद्ध पाणी व नळपाणी पुरवठा सुरु करणे आदी कामांचा भीमाशंकर परिसर विकास आराखड्यात समावेश आहे. असे वळसे पाटील यांनी सांगितले.

Web Title: Marathi news pune news bhimashankar development plan