पुणे: शनिवार पेठेत मांजामुळे घारीचा मृत्यू

पांडुरंग सरोदे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

चीनी नायलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा जीव गेला,एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. पशु-पक्ष तर दररोजच मांजाचे बळी पडतायेत. पशु-पक्षी व माणसांच्या जीवावर उठलेल्या मांजाची सरार्सपणे विक्री होत असुनही पोलिस प्रशासन मात्र ठोस कारवाई करत नसल्याची सद्यस्थिती आहे.

पुणे : चीनी नायलॉन मांजामुळे पक्षी जखमी होण्याचा आणि मृत्युमुखी पडण्याचा प्रकार थांबण्यास अद्याप तयार नाही. बुधवारी सकाळी शनिवार पेठेत मांजामुळे गंभीर जखमी होउन एक घार मृत अवस्थेत आढळून आली.

शनिवार पेठेतील राजमाचिकर गल्लीतील हसबनीस बखली जवलील एका इमारतीच्या गच्चीवर एक घार लटकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे महेश सुर्यवंशी यांना दिसली. त्यांनी तत्काळ इमारतीमधील रहिवासी अजित राजमाचीकर यांना याविषयी माहिती दिली. राजमाचीकर यांनी गच्चीवर जाऊन पाहणी केल्यानंतर त्यांना एक घार मांजामुळे गंभीर जखमी होउन मृत्युमुखी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

गळ्याभोवती मांजा अडकुन झालेल्या दुर्घटनेत "सकाळ"च्या कर्मचारी सुवर्णा मुजुमदार यांचा रविवारी मृत्यु झाला होता. तर एक तरुण गंभीर जखमी झाला होता. मांजामुळे पक्षी जखमी होण्याचे प्रकार दररोजच घडत आहेत.

चीनी नायलॉन मांजामुळे एका व्यक्तीचा जीव गेला,एक व्यक्ती गंभीर जखमी झाली. पशु-पक्ष तर दररोजच मांजाचे बळी पडतायेत. पशु-पक्षी व माणसांच्या जीवावर उठलेल्या मांजाची सरार्सपणे विक्री होत असुनही पोलिस प्रशासन मात्र ठोस कारवाई करत नसल्याची सद्यस्थिती आहे.

Web Title: Marathi news Pune news bird died on Manja