क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची पुण्यतिथी साजरी

मिलिंद संधान
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

नवी सांगवी (पुणे) : आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक कृती समिती पिंपरी-चिंचवड शहर व कै. पांडुरंग धोडिंबा माकर प्रतिष्ठानच्या वतीने उमाजी नाईक यांची 186वी पुण्यतिथी आज पिंपळे सौदागर येथे साजरी करण्यात आली. 

मारुती मंदिरात पार पडलेल्या या कार्यक्रमात क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे यांनी पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष विजय धनवटे, सचिव दीपक माकर, पोपट काटे, दादा मदने, रानबा भिसे व समाज बांधव उपस्थित होते. 

दरम्यान आरोग्य विभागातील सिद्धार्थ सातपुते, सागर शिंदे, रामा मंजाळ, सोनाली अडागळे व योगिनी निंबाळकर या कर्मचाऱ्यांनी 'स्वच्छ सर्वेक्षण 2018' या उपक्रमातंर्गत प्रभागामध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल त्यांना कै. पांडुरंग धोडिंबा माकर प्रतिष्ठान वतीने आद्य क्रांतिवीर 'राजे उमाजी नाईक पुरस्कार 2018' पुरस्कारने गौरविण्यात आले.

Web Title: Marathi news pune news birth anniversary of umaji naik