पिंपरी: तलवारीने केक कापणाऱ्यांची कोठडीत रवानगी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हा कारवाई केली आहे. या दोघांसह आठ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचाही शोध घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागात राहणाऱ्या सुरुज काटे या तरुणाने आपल्या वाढदिवशी केक कापण्यासाठी अशा पद्धतीने तलवारीचा वापर केला

पिंपरी : वाढदिवसानिमित्त तलवारीने केक कापून आनंद साजरा करणारा तरुण आणि त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवड पोलिसांनी हा कारवाई केली आहे. या दोघांसह आठ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचाही शोध घेतला जात आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सांगवी भागात राहणाऱ्या सुरुज काटे या तरुणाने आपल्या वाढदिवशी केक कापण्यासाठी अशा पद्धतीने तलवारीचा वापर केला आणि त्या फोटोंच प्रदर्शन सोशल मिडियावरही केले. मात्र हा प्रकार सूरज आणि त्याच्या साथीदारांना चांगलाच महागात पडले. 

सोशल माध्यमांवर अशा प्रकारे फ़ोटो टाकणे आणि बेकायदेशीर जमाव जमविल्याप्रकरणी सांगवी पोलिसांनी सूरजविरुद्ध स्वतः फिर्याद देत त्याला आणि त्याच्या मित्राला अटक करून न्यायलयासमोर हजर केले. तेव्हा न्यायालयाने सर्व या प्रकाराची गंभीर दखल घेत, आरोपींना चौदा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. सुरजला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शहरातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या नेत्यांनीही हजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय पाठबळ मिळत असल्यानेच, अशा प्रवृत्ती बळावत असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

Web Title: Marathi news Pune news birthday celebration in pimpri